ODI World Cup : एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात आला नाही तर काय होणार?


आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करताच पुन्हा एकदा पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात येणार की नाही? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात येईल, असा विश्वास आहे, असे आयसीसीकडून सांगण्यात आले होते, परंतु त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून या प्रकरणाचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल, असे विधान आले. पाकिस्तान विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतात आला नाही तर काय होईल? हे जाणून घेऊया.

जर पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला भारतात पाठवण्याची परवानगी दिली नाही, तर पाकिस्तान संघ येऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत त्याला आयसीसीकडून शिक्षाही होऊ शकते.

जर पाकिस्तान विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतात आला नाही, तर आयसीसी त्याच्या जागी शेवटच्या क्षणी दुसऱ्या संघाचा समावेश करू शकते, जो पाकिस्तानची जागा घेईल.

जर आयसीसीने ठरवले की त्यात पाकिस्तानच्या जागी इतर कोणाचाही समावेश होणार नाही, तर ही स्पर्धा नऊ संघांची असेल आणि अशा परिस्थितीत जे संघ पाकिस्तानविरुद्ध सामने खेळणार होते, त्यांना प्रत्येकी दोन गुण दिले जातील.

जर पाकिस्तान या विश्वचषकात सहभागी झाला नाही, तर पहिल्यांदाच विश्वचषक पाकिस्तानशिवाय खेळवला जाणार आहे. हा संघ 1992 मध्ये विश्वविजेता बनला होता, पण तेव्हापासून एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकला नाही.