Women’s Ashes : वयाच्या 32 व्या वर्षी पदार्पण करणारी विराट कोहलीची चाहती डॅनियल व्याट इंग्लंडला तारणार!


अवघ्या इंग्लंडच्या नजरा सध्या वयाच्या 32 व्या वर्षी कसोटी पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीच्या चाहतीवर खिळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा महिला अॅशेस सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 5 विकेट्सची गरज आहे, तर इंग्लंडला 152 धावांची गरज आहे.

कोहलीची चाहती इंग्लिश स्टार डॅनियल व्याट चौथ्या दिवसाच खेळ संपेपर्यंत क्रीजवर नाबाद होती. आता तिला पदार्पणाचा कसोटी सामना संस्मरणीय बनवण्याची संधी आहे. 32 वर्षीय व्याटने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु तिला आताच कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता ती संपूर्ण इंग्लंडची सर्वात मोठी आशा बनली आहे.

व्याट उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. पहिल्या डावातही तिने 44 धावा केल्या होत्या. कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात तिचे अर्धशतक हुकले असले तरी आता शेवटच्या डावात तिला सर्व अडथळे बाजूला काढून संघाला विजय मिळवून देण्याची संधी आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर, दिवसाखेर इंग्लंडने 268 धावांच्या प्रत्युत्तरात 5 गडी गमावून 116 धावा केल्या आहेत.

इंग्लंडच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या टॅमीला शेवटच्या डावात केवळ 22 धावा करता आल्या. तिच्याशिवाय एम्माने 28, कॅप्टन हीथर नाइटने 9, नेट सीव्हर ब्रंटने 0 आणि सोफी डंकलेने 16 धावा केल्या. 20 धावांवर व्याट नाबाद आहे. तिच्यासोबत कॅट क्रॉस मैदानावर आहे.

बेथ मुनीशिवाय अ‍ॅलिसा हिलीने पन्नास ठोकले. इंग्लिश गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने 5 बळी घेतले. तिच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 257 धावांत आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 10 धावांची आघाडी मिळाली आणि दुसऱ्या डावात 257 धावा केल्यानंतर त्यांनी इंग्लंडसमोर 258 धावांचे लक्ष्य ठेवले होते.