TNPL 2023 : IPL 2023 मध्ये पंजाब किंग्सने ज्याला दिली नाही एकही ओव्हर दिली नाही, तोच शाहरुख खान आता बनला ‘टॉप बॉलर’!


आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जने आपल्या एका गोलंदाजाला एकही षटक टाकण्याची संधी दिली नाही. तोच आता तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. तो TNPL 2023 च्या टॉप 2 गोलंदाजांपैकी एक बनला आहे. शाहरुख खानने आयपीएल 2023 मध्ये पंजाबसाठी 14 सामने खेळले, परंतु एकाही सामन्यात त्याला चेंडू देण्यात आला नाही. त्याला फक्त फलंदाजीची संधी मिळाली. जिथे त्याने 156 धावा केल्या.

तो चेंडूने काय करू शकतो, हे त्याने टीएनपीएलमध्ये दाखवून दिले. तो लीगमधील टॉप 2 गोलंदाज बनला आहे. लीगच्या 16व्या सामन्यात लायका कोवई किंग्जकडून खेळताना त्याने 2 विकेट घेतल्या आणि यासह एकूण 9 विकेट्स घेत शाहरुखची पर्पल कॅप डोक्यावर सजली. तो अव्वल गोलंदाज ठरला आहे. मात्र, पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर फार काळ टिकली नाही.

पुढच्या सामन्यात आयड्रिम तिरुपूरच्या भुवनेश्वरनने 4 बळी घेत त्याला मागे टाकले. आता दोघांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. भुवनेश्वरनने 4 सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत, तर शाहरुखच्या नावावर 5 सामन्यात 9 बळी आहेत.

शाहरुख आपल्या संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या संघातील सिद्धार्थ आणि एम मोहम्मद यांनी 6-6 विकेट्स घेतल्या आहेत. शाहरुख देखील कोवईचे नेतृत्व करत आहे आणि त्याच्या संघाने आर अश्विनच्या डिंडीगुल ड्रॅगन्सचा 59 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना कोवईने 20 षटकांत 5 गडी गमावून 206 धावांची मोठी धावसंख्या उभारली. कोवईच्या साई सुदर्शनने 41 चेंडूत 83 धावा केल्या, तर कर्णधार शाहरुखने 11 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. 207 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ड्रॅगन्स संघ 19.1 षटकात 147 धावांवर सर्वबाद झाला. शाहरुखने शिवम सिंगला 61 धावांवर आणि शरत कुमारला 36 धावांवर बाद केले.