शिखर धवन टीम इंडियातून बाहेर पडत असला, तरी तो लवकरच संघात पुनरागमन करू शकतो. बातम्यांनुसार, शिखर धवन आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्वही करू शकतो.
Asian Games 2023 : टीम इंडियात परतणार गब्बर, होणार कर्णधार, जाणार चीनला !
आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. शिखर धवनकडे बीसीसीआय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवेल, असे मानले जात आहे.
तसे, आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचा भाग असणारे खेळाडू 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ब संघ चीनला पाठवणार आहे. ज्यामध्ये पृथ्वी शॉ, रिंकू सिंग, तिलक वर्मा ही नावे असू शकतात.
याआधीही शिखर धवनला भारताच्या ‘बी’ संघाचा कर्णधार म्हणून पाठवण्यात आले आहे. 2021 मध्ये जेव्हा टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती, त्याच वेळी भारताची ब टीम श्रीलंकेला पाठवण्यात आली होती.
शिखर धवन विश्वचषक संघाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर असल्याचे मानले जात आहे. त्याच्या जागी शुभमन गिल खेळणार आहे, जो या फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. अशा स्थितीत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची जबाबदारी शिखर धवनवर येण्याची शक्यता आहे.