Airtel 289 Plan : आला एअरटेलचा स्वस्त प्लान, मिळेल 35 दिवसांची वैधता


टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी नवीन प्लान लॉन्च केला आहे. एअरटेलचा नवीन रिचार्ज प्लान कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट करण्यात आला असून या प्लानची किंमत 289 रुपये ठेवण्यात आली आहे. 289 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळेल? आणि हा प्लॅन किती दिवसांच्या वैधतेसह लॉन्च करण्यात आला आहे? चला तुमच्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देतो.

289 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 4 GB हाय स्पीड डेटासह अमर्यादित मोफत कॉलिंग आणि 300 एसएमएस सुविधा मिळेल.

एअरटेलच्या या प्लॅनसह यूजर्सना कंपनीकडून 35 दिवसांची वैधता मिळेल. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, 289 रुपयांच्या या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यावर तुम्हाला फ्री हॅलोट्यून, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री विंक म्युझिकचा लाभ दिला जात आहे. हा प्लान वापरण्यासाठी रोजचा खर्च 8.25 रुपये असेल.

रिलायन्स जिओकडे रु. 289 चा प्लॅन नाही, पण एअरटेलच्या रु. 289 प्लॅनला टक्कर देण्यासाठी जिओकडे 299 रु.चा प्लॅन नक्कीच आहे. Jio च्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB हाय स्पीड डेटा, मोफत अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा दिली जाते. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, त्यानुसार हा प्लान यूजर्सना एकूण 56 GB हाय स्पीड डेटाचा लाभ देतो.

एअरटेल आणि रिलायन्स जिओ प्लॅनमधला फरक असा आहे की एअरटेलचा हा प्लान तुम्हाला फक्त 4 GB डेटा देईल तर Jio वापरकर्त्यांना दररोज 2 GB डेटाचा फायदा देत आहे. एकीकडे Airtel फक्त 4 GB डेटा देत आहे, तर दुसरीकडे, यूजर्सला Jio सोबत एकूण 56 GB डेटा मिळत आहे.