High Paying Jobs : फेसबुक दुसऱ्या, तर तिसऱ्या क्रमांकावर गुगल, मग सर्वात जास्त पगार देणारी कंपनी कोणती?


2022 च्या ऑक्टोबरमध्ये, ट्विटरने पहिल्यांदा कर्मचारी कपातीची सुरुवात केली. यानंतर छाटणीची ही आग मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, फेसबुकची मूळ कंपनी मेटा आणि गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटपर्यंत पोहोचली. प्रत्येक कंपनीत हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, असे असूनही गुगल आणि फेसबुक आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत, तरीही ते अव्वल स्थानी नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चांगला पगार देणाऱ्या टॉप-3 कंपन्यांमध्ये मेटा आणि अल्फाबेटची नावे समाविष्ट आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने माहिती गोळा करणाऱ्या कंपनी MyLogIQ च्या माहितीच्या आधारे ही बातमी दिली आहे.

278 कंपन्यांपैकी टॉप-3 मध्ये गुगल आणि फेसबुक
MyLogic ने S&P 500 मध्ये समाविष्ट असलेल्या 278 कंपन्यांच्या आर्थिक माहितीचे विश्लेषण केले. यामध्ये सर्व कंपन्यांच्या सरासरी पगाराच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, गुगल आणि फेसबुकने 2022 मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार दिला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो, S&P 500 हा अमेरिकेचा शेअर बाजार निर्देशांक आहे, भारतातील निफ्टी 50 प्रमाणे, ते तेथील 500 मोठ्या कंपन्यांच्या आर्थिक खाती आणि इतर क्रियाकलापांवर लक्ष ठेवते.

कर्मचाऱ्यांना मिळाला एवढा सरासरी पगार
डेटा अ‍ॅनालिसिस केल्यानंतर असे आढळून आले की, फेसबुक सरासरी 3 लाख डॉलर वेतन देऊन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अल्फाबेट $2.80 लाख पगारासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आणि $4.15 लाख सरासरी पगारासह यादीत शीर्षस्थानी असलेली कंपनी रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट आहे. Vici Properties of America नावाच्या या कंपनीत फक्त 22 कर्मचारी काम करतात.

नोव्हेंबर 2022 मध्ये मेटाने 11,000 लोकांना कामावरून काढून टाकले होते. तर यावर्षी मार्चमध्ये आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याच वेळी, गुगलने 12,000 लोकांना कामावरून काढून टाकण्याचे म्हटले होते.