Yoga Centers : भारतातील सर्वात प्रसिद्ध योग केंद्र, जिथे परदेशातूनही येतात लोक


योगाचा उगम भारतात झाला असेल, पण आता तो जगभर पसरला आहे. अनेक परदेशी स्टार्सही आता योगासने आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करत आहेत. असे मानले जाते की भारतातील योगाचा इतिहास सुमारे 10 हजार वर्षांचा आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध योग केंद्रांबद्दल सांगणार आहोत.

स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी 1964 मध्ये या योग केंद्राची स्थापना केली. योग साधकांमध्ये हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे. ऑक्टोबर ते जानेवारी असे चार महिने येथे हा अभ्यासक्रम चालवला जातो.

मुंबईतील योग संस्थेची स्थापना 1918 साली झाली. भारतातील सर्वात जुन्या योग केंद्रांमध्ये याची गणना होते. योगासनांच्या अभ्यासक्रमांबरोबरच येथे कार्यशाळा आणि शिबिरेही आयोजित केली जातात.

राममणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट : पुण्यातील या योग संस्थेत जगभरातून लोक योग शिकण्यासाठी येतात. येथील विशेष बाब म्हणजे या योग केंद्रात प्रवेश घेण्यासाठी अय्यंगार योगाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

परमार्थ निकेतन: ऋषिकेश, उत्तराखंड येथे परमार्थ निकेतन हे सर्वात मोठे योग केंद्र आहे. त्याची स्थापना 1984 मध्ये झाली. या आश्रमात दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचे आयोजन केले जाते.