भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना 21 जून रोजी बेंगळुरू येथे खेळवला जाईल. दोघेही दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अर्थात SAFF चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहेत. 21 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. विजेतेपदाचा सामना 4 जुलै रोजी होणार आहे. पाकिस्तानच्या फुटबॉल संघालाही या स्पर्धेसाठी व्हिसा मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हाय व्होल्टेज सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
IND vs PAK : पाकिस्तानी खेळाडूंचा पगार ऐकून तुम्हाला येईल त्यांची दया! भारतात येणारा संघाची किती कमाई?
या सामन्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की ज्या सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. पाकिस्तान ज्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यांचा अभिमान आहे अशा स्टार खेळाडूंचा पगार किती आहे? पाकिस्तानी फुटबॉलपटूंचा पगार जाणून तुम्हाला वाईट वाटेल.
पाकिस्तानातील फुटबॉलपटूंचा वार्षिक पगार पाकिस्तानी रुपयात 9,96,821 आहे. म्हणजे भारतीय रुपयात पाकिस्तानी फुटबॉलपटूंचा वार्षिक पगार 2,84,010 आहे. म्हणजेच एका महिन्याची कमाई 23,667 रुपयांच्या जवळपास आहे. हे खेळाडूचे सरासरी वार्षिक वेतन आहे. याशिवाय भत्ता, सांघिक शिबिरही फेडरेशनकडून दिले जाते.
पाकिस्तानी फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय सामन्यात 12,000 रुपये भत्ता दिला जातो आणि नॉन-मॅच डे भत्ता 6,000 रुपये आहे. चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि पाकिस्तानसह एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. आठ संघांची अ गट आणि ब गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात आहेत. दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
या चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तानचा संघ पहिल्या रविवारीच भारतात पोहोचणार होता, परंतु व्हिसाच्या समस्येमुळे त्यांचे मॉरिशसहून प्रस्थान होण्यास उशीर झाला. वास्तविक, पाकिस्तानच्या व्यवस्थापनाने मॉरिशसमध्ये भारतीय व्हिसासाठी अर्ज केला होता आणि ही प्रक्रिया शनिवारपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, परंतु व्हिसा देण्यास विलंब झाला. सोमवारी संध्याकाळी पाकिस्तान संघासाठी व्हिसा जारी करण्यात आला.