Apna App Success Story : एका तरुणाने 22 महिन्यात आयडियाची कल्पना वापरुन कशी बनवली युनिकॉर्न कंपनी ?


भारताबाबत बोलायचे झाले तर सध्या तरुणांसमोर नोकरी मिळवणे हे मोठे आव्हान आहे. खरे तर देशातील तरुणांमध्ये टॅलेंटची कमी नाही. पण त्यांच्यासमोर नोकरी मिळवण्याचे मोठे आव्हान आहे, ते म्हणजे त्यांच्याजवळ योग्य रिझ्युम नसणे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने तरुणाईची ही समस्या समजून घेतली आणि ती दूर करण्यासाठी अॅप बनवले.

याद्वारे त्याने एक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म तयार केला, ज्याच्या मदतीने लोक थेट कंपन्यांच्या एचआरशी बोलून मुलाखती निश्चित करू शकतात. या अॅपच्या मदतीने लोकांना नोकऱ्या मिळण्यास मोठी मदत झाली. लोकांना नोकऱ्या देण्याबरोबरच या कंपनीने स्वतःही अल्पावधीतच प्रगती केली आणि अवघ्या 22 महिन्यांत देशातील सर्वात वेगवान युनिकॉर्न कंपनी बनून इतिहास रचला.

‘अपना’च्या संस्थापकाचे नाव आहे निर्मित पारीख. ते कंपनीचे सीईओही आहेत. त्यांनी 2019 मध्ये ‘अपना’ची सुरुवात केली. निर्मितने निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची पदवी घेतली. निर्मितीने आपल्या क्षमतेच्या जोरावर 22 महिन्यांत युनिकॉर्न कंपनी बनवली. आज त्याच्या कंपनीचे मूल्य $1.1 अब्ज आहे. निर्मितबद्दल बोलायचे झाले, तर त्याचे वडील आणि आजोबा इंजिनिअर होते.

तो लहानपणापासून सर्जनशील होता आणि वयाच्या सातव्या वर्षी त्याने डिजिटल क्लॉक सर्किट बनवले. जेव्हा तो केवळ 13 वर्षांचा होता, तेव्हा त्याने रोबोटिक्समध्ये पहिले प्रोग्रामिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2006 मध्ये जेव्हा तो B.Tech करत होता, तेव्हा त्याने एक तंत्रज्ञान विकसित केले ज्याने आपल्याला केवळ पुरापासून वाचवले नाही, तर जलविद्युत निर्माण करण्यासही मदत केली. निर्मितने यूएसमध्ये इंटेलसाठी डेटा अॅनालिटिक्सचे संचालक म्हणून काम केले. त्याचवेळी एमबीए केल्यानंतर त्याने अॅपलमध्ये नोकरी केली.

Apna अॅप बद्दल बोलायचे तर, हे एक डिजिटल रिक्रूटमेंट प्लॅटफॉर्म आहे, जे लोकांना त्यांच्या कौशल्य आणि अनुभवावर आधारित नोकरीच्या संधी उपलब्ध करून देते. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 70 हून अधिक श्रेणींमध्ये 50 लाखांहून अधिक नोकऱ्या पाहायला मिळतील. या कंपनीची सेवा 70 हून अधिक शहरांमध्ये आहे.

सध्या, 2 लाखाहून अधिक आंतरराष्ट्रीय आणि छोट्या कंपन्या Apna App वर उपलब्ध आहेत, जे लोकांना अर्धवेळ, पूर्ण वेळ, नाईट शिफ्ट, घरून काम यासारखे नोकरीचे पर्याय उपलब्ध करून देतात. या अॅपच्या मदतीने, नोकरी शोधणारे केवळ कंपनीच्या एचआरशी कनेक्ट होऊ शकत नाहीत, तर व्हॉट्सअॅप चॅट किंवा कॉलवर एचआरशी बोलून घर बसल्या मुलाखत निश्चित करू शकतात.

सध्या Swiggy, Zomato, Flipkart, Paytm आणि Byjus सारख्या मोठ्या कंपन्या Apna App च्या प्लॅटफॉर्मवर जोडल्या गेल्या आहेत. सध्या त्याच्या अॅपचे 10 दशलक्षाहून अधिक डाउनलोड झाले आहेत.