Box Office Collection : दुसऱ्या दिवशी ‘आदिपुरुष’चा वेग मंदावला, तरीही पार केला 50 कोटींचा आकडा


‘आदिपुरुष’च्या रिलीजचा आज तिसरा दिवस आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मात्र, ‘आदिपुरुष’बाबत रोज नवनवीन वाद चव्हाट्यावर येत आहेत. चित्रपटाबाबत लोक न्यायालयात पोहोचत आहेत. ‘आदिपुरुष’च्या संवादांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. या चित्रपटावर लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे.

या सर्व वादानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी, जिथे प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ ने जगभरात विक्रम मोडून आणि 140 कोटींचा गल्ला जमवून सर्वांना हादरवले. त्याचवेळी दुसऱ्या दिवसाची आकडेवारीही समोर आली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत कमाईत थोडीशी घट झाली आहे, मात्र मंदावल्यानंतरही चित्रपटाने 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ने दुसऱ्या दिवशीही धमाकेदार कमाई केली आहे. पण सुरुवातीच्या दिवसानुसार ते थोडे कमी आहे. बातम्यांनुसार, ‘आदिपुरुष’ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 65 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाची दोन दिवसांची कमाई 151.75 कोटींवर पोहोचली आहे. अवघ्या दोन दिवसांत 150 कोटींहून अधिक कलेक्शन ही एक आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर रविवारच्या सुट्टीतही हा चित्रपट बऱ्यापैकी कमाई करणार असल्याचे मानले जात आहे.

पहिल्या दिवसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ‘आदिपुरुष’ने हिंदी भाषेत 37.25 कोटी, मल्याळम भाषेत 40 लाख, कन्नड भाषेत 40 लाख, तामिळ भाषेत 70 लाख आणि तेलुगू भाषेत 48 कोटींचा व्यवसाय केला आहे. म्हणजेच सर्व भाषांमध्ये मिळून एकूण 86.75 कोटींची कमाई आता ‘आदिपुरुष’ आगामी काळात आणखी कोणते विक्रम मोडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.