500 Note Disappeared : कुठे ‘गायब’ झाल्या 500 रुपयांच्या नोटा? मिळत नाही 88 हजार कोटींचा हिशोब


500 रुपयांच्या नोटा बाजारातून अचानक गायब झाल्या आहेत. सुमारे 88 हजार कोटी रुपयांच्या 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. या गायब झालेल्या पैशांचा कोणताही हिशोब नाही. आरबीआयने 500 रुपयांच्या 8810.65 दशलक्ष नोटा छापल्या होत्या. पण, बँकांकडे फक्त 7260 दशलक्ष नोटा मिळाल्या. म्हणजेच 500 रुपयांच्या 176 कोटी नोटा मध्येच गायब झाल्या. अशा परिस्थितीत ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी असल्याचे म्हटले जात आहे. या हरवलेल्या नोटांची किंमत काढली, तर ती सुमारे 88 हजार कोटी रुपये आहे. एका आरटीआय अहवालात ही बाब समोर आली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो, देशात फक्त चार ठिकाणी नोटांची छपाई केली जाते. आरबीआय फक्त देवास, नाशिक, म्हैसूर आणि सालबोनी येथे नोटांची छपाई करते. अशा परिस्थितीत एप्रिल 2015 ते मार्च 2016 दरम्यान करन्सी नोट प्रेस नाशिकने 210 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या, आता सुमारे 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब आहेत.

माहिती अधिकारात झाले उघड
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, एका आरटीआय अहवालात ही बाब समोर आली आहे. कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी आरटीआयच्या माध्यमातून या नोटांवर प्रश्न उपस्थित केला होता. मनोरंजन यांनी 1760.65 दशलक्ष गहाळ नोटांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 88 हजार कोटींच्या नोटांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

कार्यकर्त्याने दाखवले हे आकडे
एफपीजेनुसार, कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांना आरटीआयद्वारे या गहाळ नोटांबद्दल जाणून घ्यायचे होते. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक युनिटमध्ये 2015 ते मार्च 2016 या कालावधीत नोटांची छपाई करण्यात आली होती. त्यादरम्यान सुमारे 375.450 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. पण आरबीआयच्या रेकॉर्डमध्ये केवळ 345 दशलक्ष नोटा सापडल्या. आम्ही तुम्हाला सांगतो, रघुराम राजन 2015-2016 या वर्षात RBI चे गव्हर्नर होते. एप्रिल 2015 ते मार्च 2016 दरम्यान 500 रुपयांच्या 210 दशलक्ष नोटा छापण्यात आल्याचे आरटीआयमध्ये सांगण्यात आले. ज्या आरबीआयकडे पाठवण्यात आल्या होत्या.

नोट प्रेसने सेंट्रल बँकेला पाठवल्या नोट्स
नाशिकमध्ये नोटांची छपाई करणाऱ्या प्रेस रिपोर्टमध्ये त्यांनी 500 रुपयांच्या नव्या नोटा सेंट्रल बँकेला पाठवल्याचे म्हटले आहे. तथापि, सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या आरबीआयच्या वार्षिक अहवालात याचा उल्लेख नाही. आरबीआयने 500 रुपयांच्या या नव्या नोटा पाठवल्याचेही सांगितले नाही. कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, यावरून हे स्पष्ट होते की आरबीआयला 210 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा मिळालेल्या नाहीत.