अॅशेसमध्ये अंपायरिंग करणारे नितीन मेनन यांनी सांगितील मोठी गोष्ट, म्हणाले- अंपायरवर दबाव टाकतात टीम इंडियाचे स्टार खेळाडू


भारताचे पंच नितीन मेनन यांच्याकडून मोठी वक्तव्य नोंदवले गेले आहे. ते क्रिकेटमधील सर्वात जुना प्रतिस्पर्धी असलेल्या अॅशेस मालिकेत अंपायरिंग करताना दिसणार आहे. नितीन यांचा आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये समावेश करण्यात आला असून अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यापासून ते अंपायरिंग टीमचा भाग असेल. या मालिकेत ते प्रथमच अंपायरिंग करताना दिसणार आहेत. ते जून 2020 मध्ये ICC च्या एलिट पॅनेलमध्ये सामील झाले. अॅशेसमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मेनन यांनी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. मेनन म्हणाले की, जेव्हा भारतात सामने होतात, तेव्हा टीम इंडियाचे स्टार्स खूप दबाव निर्माण करतात.

कोविडमुळे मेनन यांनी बहुतांशी भारतात अंपायरिंग केले होते. याशिवाय, संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक आणि गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकातही त्यांनी अंपायरिंग केले होते. याशिवाय त्यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात इंग्लंडमध्येच झालेल्या मालिकेत अंपायरिंगही केले आहे.

अॅशेस मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये मेनन अंपायरिंग टीमचा भाग आहे. मेनन यांनी म्हटले आहे की, भारतात अंपायरिंग खूप तणावपूर्ण आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मेनन म्हणाले की, जेव्हा भारतीय संघ भारतात खेळतो, तेव्हा खूप हाईप होतो. ते म्हणाले की टीम इंडियामध्ये अनेक मोठे स्टार्स आहेत, जे नेहमी पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मेनन म्हणाले की, 50-50 निर्णय त्यांच्या बाजूने जावेत असा त्यांचा प्रयत्न आहे. मेनन म्हणाले की, पण अशा परिस्थितीत अंपायरचे नियंत्रण राहिले, तर काहीही होत नाही.

मेनन म्हणाले की, मायदेशात आंतरराष्ट्रीय अंपायरिंग पॅनलचे नेतृत्व करणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून ते एक चांगला पंच बनले आहेत. मेनन म्हणाले की, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी त्यांना खूप मदत केली. श्रीनाथ 15 वर्षांहून अधिक काळ सामनाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. मेनन म्हणाले की, त्यांना रेफरी म्हणून खूप अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते.

अॅशेस मालिकेसाठी आपण तयार आहे आणि या मालिकेत काम करणे, हे आपले स्वप्न असल्याचे मेनन यांनी सांगितले. मेनन यांनी सांगितले की कोविडमुळे ते शेवटच्या अॅशेसमध्ये जाऊ शकले नाही आणि यावेळी त्यांना संधी मिळाली आहे, त्यामुळे ते आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतील. लवकरच आयसीसी एलिट पॅनलमध्ये आणखी भारतीय पंचांचा समावेश होईल, अशी आशाही मेनन यांनी व्यक्त केली आहे.