बांगलादेश क्रिकेट संघाने आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या संघाने मायदेशात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला. बांगलादेशचा कसोटी इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर 662 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विशाल लक्ष्यासमोर अफगाणिस्तानचा संघ केवळ 115 धावा करू शकला आणि शनिवारी चौथ्या दिवशी सामना गमावला.
BAN vs AFG : बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव करत मिळवला सर्वात मोठा कसोटी विजय
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा केल्या. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 146 धावांत आटोपला. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 236 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला. त्यानंतर बांगलादेशने आपला दुसरा डाव चार गडी गमावून 425 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशने मजबूत लक्ष्य दिले ज्यासमोर अफगाणिस्तानचा संघ कोलमडला.
Walton Test Match: Bangladesh vs Afghanistan | Only Test
Player of the Match:
Najmul Hossain Shanto (146 & 124 Runs)🔥Full Match Details: https://t.co/MDvtIwN35K#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/N1x40zibMA
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2023
बांगलादेशचा फलंदाज नजमुल हुसेन शांतोने या सामन्यात शानदार फलंदाजी करत दोन्ही डावात शतके झळकावली. शांतोने पहिल्या डावात 23 चेंडू आणि 2 चौकारांच्या मदतीने 175 चेंडूत 146 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही त्याने शतक झळकावले. दुसऱ्या डावात या फलंदाजाने 151 चेंडूंचा सामना केला आणि 15 चौकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. मोमिनुल हकने दुसऱ्या डावात शतक झळकावले. मोमिनुलने 121 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्याने 145 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याच्याशिवाय लिटन दासने 81 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. सलामीवीर झाकीर हसनने 71 धावा केल्या.
Biggest margin win in 5-day Tests (by 546 runs) and third biggest margin victory in the history of Test cricket#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/SXtkO4MOWl
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2023
या सर्व डावामुळे बांगलादेशने दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारली. यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. बांगलादेशकडून तस्किन अहमदने चार बळी घेतले. शरीफुल इस्लामने तीन विकेट्स घेतल्या आहेत.
Walton Test Match: Bangladesh vs Afghanistan | Only Test | Day 04
Moments of the day ✨#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/vpPezN5bPH
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2023
अफगाणिस्तान संघासाठी हा सामना अविस्मरणीय ठरला. या सामन्यात अफगाणिस्तानला एकाच सत्रात चांगला खेळ करता आला. दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानने अवघ्या 20 धावांत बांगलादेशच्या पाच विकेट्स घेतल्या. याशिवाय अफगाणिस्तान या सामन्यात कधीही दिसला नाही. अफगाणिस्तानच्या संघाला दोन्ही डावात एकदाही 150 धावा करता आल्या नाहीत. त्यांच्यासाठी या सामन्यात एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. रहमत शाहने दुसऱ्या डावात संघाकडून सर्वाधिक 30 धावा केल्या. तर करीम जनातने 18 आणि कर्णधार हसमतुल्लाह शाहिदीने 13 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात या तिघांशिवाय अफगाणिस्तानच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही पार करता आला नाही.