तीन दशकांनंतर साऊथ आणि बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सची होणार युती, या चित्रपटांमध्ये दिसले होते एकत्र


भारतात जेव्हा जेव्हा बड्या सुपरस्टार्सची चर्चा होते, तेव्हा अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचे नाव अग्रक्रमाने येते. दोघांनीही देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे आणि जगभर प्रसिद्धी मिळवली आहे. भारतात या दोन्ही मेगास्टारच्या चाहत्यांची कमतरता नाही आणि चाहते त्यांच्या चित्रपटांची नेहमीच वाट पाहत असतात. या दोन्ही कलाकारांनी काही प्रसंगी एकत्र कामही केले आहे.

आता पुन्हा एकदा अमिताभ आणि रजनीकांत एकत्र दिसणार आहेत. या दोन कलाकारांना जेव्हा रुपेरी पडद्यावर एकत्र काम करण्याची संधी मिळाली, त्याआधी कोणते चित्रपट होते ते जाणून घेऊया.

1- गिरफ्तार – 1985 साली आलेल्या गिरफ्तार चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र दिसले होते, जे पुन्हा कधीही कोणत्याही चित्रपटात एकत्र काम करताना दिसले नाहीत. त्यापैकी एक होता बॉलीवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन, दुसरा होता साऊथ इंडस्ट्रीचा मेगास्टार रजनीकांत आणि तिसरा दक्षिणेचा सुपर टॅलेंटेड अभिनेता कमल हसन होता. चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 1985 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

2- अंधा कानून – अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांची जोडी पुन्हा एकदा अंधा कानून या चित्रपटात एकत्र दिसली. या चित्रपटात अमिताभ दुहेरी भूमिकेत होते आणि रजनीकांत यांची छोटी भूमिका होती. पण दोन्ही अभिनेत्यांना एका मंचावर एकत्र काम करताना पाहून चाहते मात्र उत्सुक होते.

3- हम – अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये अनेक मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये काम केले आहे. रजनीकांत व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीतील अभिनेता गोविंदासोबतही काम केले आहे. पण एक चित्रपट असाही होता, ज्यात अमिताभ बच्चनसोबत गोविंदा आणि रजनीकांत दोघेही दिसले होते. चित्रपट होता हम. यामध्ये रजनीकांत आणि गोविंदा यांनी अमिताभ बच्चन यांच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आणि आजही जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर येतो, तेव्हा लोक मोठ्या उत्सुकतेने पाहतात.