2000 Note : आरबीआयकडे जमा झाल्या 1.80 लाख कोटींच्या 2000 च्या नोटा, आता त्यांचे काय करणार आरबीआय ?


2000 च्या नोटांची अदलाबदली सुरू होऊन 2 आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत सुमारे 50 टक्के 2000 च्या नोटा बँकांमध्ये पोहोचल्या आहेत. जेव्हापासून नोटाबंदीची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून लोक बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा आणत आहेत आणि जमा करत आहेत किंवा त्या बदलून घेत आहेत. अलीकडेच, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की सुमारे 1.80 लाख कोटी 2000 च्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत.

आता प्रश्न असा पडतो की या परत आलेल्या नोटांचे बँक किंवा रिझर्व्ह बँक काय करणार? ती भंगार म्हणून विकेल की त्याच्यातूनच नवीन नोटा छापल्या जातील? निरुपयोगी झालेल्या नोटांचे RBI काय करते ते जाणून घेऊया…

नोटांचे काय करणार RBI ?
मिळालेल्या माहितीनुसार, बँक आधी बंद पडलेल्या किंवा निरुपयोगी नोटा आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात पाठवते. मग इथून या नोटा गैरवापरापासून वाचवण्यासाठी काही वेळा जाळल्या जातात. काही नोटा खोट्या आहेत का हे तपासले जाते. यासाठी खास मशिनचा वापर केला जातो.

यानंतर मशीनद्वारे नोटांचे तुकडे केले जातात. जर नोटांचे आयुष्य चांगले असेल तर त्या रिसायकल केल्या जातात आणि त्यांच्यापासून नवीन नोटा बनवल्या जातात. खराब नोटा फाडल्यानंतर या गोळा केल्या जातात. मग त्यांच्या विटा बनवल्या जातात. या नोटांचे तुकडे पुठ्ठे बनवण्यासाठी कारखान्यातही दिले जातात.

800 टन नोटांची 200 रुपये टनने झाली भंगारात विक्री
2016 मध्ये नोटाबंदी झाली, तेव्हा बँकांनी जुन्या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी आरबीआय कार्यालयात नोटा जमा केल्या होत्या. त्यानंतर नोटांचा कचरा रद्दीच्या दराने कारखान्यांना विकला जात होता. त्यावेळी सुमारे 800 टन कचरा कारखान्यांकडे आला होता. जे कंपनीने 200 रुपये प्रति टन या दराने खरेदी केली होती. म्हणजे जेवढी नोट छापली जात नाही, तिचा कचरा कारखान्यांना त्यापेक्षा कमी दराने दिला जातो.

नोट छापण्यासाठी किती खर्च येतो?
2000 ची नोट छापण्यासाठी सुमारे 4 रुपये खर्च येत होता. RBI ने 2000 च्या नोटांचे चलन बंद केले आहे. अशा स्थितीत आता त्यांच्या छपाईवर पैसा खर्च होत नाही. तथापि, 500 रुपयांची नोट छापण्याच्या बाबतीत, 500 रुपयांची नोट 1 रुपये मोजून छापली जाते. मात्र, नोटांचे चलन थांबल्यानंतर आणि बँकांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची किंमत कमी होत जाते. मग फक्त त्यांच्या पुनर्वापर प्रक्रियेवर खर्च होतो.