वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतावर पूर्णपणे वर्चस्व राखले. ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पॅट कमिन्सच्या संघाच्या नावावर होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडने शतक ठोकले आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने शतकाच्या जवळ पोहोचला आहे.
Highlights of Yesterday WTC Match : चांगली सुरुवात केल्यानंतर टीम इंडिया कुठे घसरली? 5 पाँईंटमघ्ये घ्या जाणून
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा हेड पहिला फलंदाज ठरला आहे. तत्पूर्वी, नाणेफेक भारताच्या बाजूने होती आणि रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हेड आणि स्मिथच्या फलंदाजीमुळे त्यांचा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या दिवसाची स्थिती 5 पाँईंटमध्ये
- नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आर अश्विन आणि इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. भारत 4 वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरला. 4 वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर तर फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजावर रोहितने विश्वास व्यक्त केला.
- भारताची सुरुवात अप्रतिम झाली. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजाला खातेही उघडता आले नाही. पहिल्या सत्रातच शार्दुल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला 43 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसऱ्या सत्रात मोहम्मद शमीने 25व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्नस लबुशेनला बाद केले. ऑस्ट्रेलियाने केवळ 76 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. एक प्रकारे भारत ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवताना दिसत होता.
- लबुशेन बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी एकत्र येऊन ऑस्ट्रेलियासाठी जबरदस्त पुनरागमन केले. हेडने 106 चेंडूत शतक ठोकले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. पहिल्या दिवशी त्याने 146 धावा केल्या आहेत.
- स्टीव्ह स्मिथनेही पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. तो आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला आहे. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून त्याने 95 धावांपर्यंत मजल मारली.
- पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 बाद 327 धावा केल्या होत्या. हेड आणि स्मिथमध्ये 251 धावांची भागीदारी आहे. अंतिम फेरीतील ही सर्वात मोठी भागीदारी आहे.