SL vs AFG : एमएस धोनीला चॅम्पियन बनवणाऱ्या मथिसा पथिराणाची घरच्या मैदानात धुलाई, बॉलिंगच विसरला!


एमएस धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. त्याच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. शेवटच्या 2 चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारणारा रवींद्र जडेजा या विजयाचा हिरो नक्कीच होता, पण चेन्नईचा हिरो मथिसा पथिराणाही होता, ज्याने चेन्नईला अंतिम फेरीत नेले. आपल्या गोलंदाजीने त्याने धोनीला इतके प्रभावित केले की धोनीने त्याच्यासाठी एका सामन्यात पंचाशी वादही घातला होता.

काही काळ मैदानाबाहेर गेल्यामुळे, जेव्हा अंपायरने पथिराणाला गोलंदाजी करण्यास नकार दिला, तेव्हा धोनीने आपल्या आग्रहावर ठाम राहून पंचांशी सुमारे 5 मिनिटे वाद घतला, त्यानंतर पथिराणा 16 वे षटक टाकण्यास पात्र ठरला. त्याने धोनीला चॅम्पियन बनवले. आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे त्याला श्रीलंकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, पण त्याची त्याच्याच घरात येथेच्छ धुलाई झाली.
https://twitter.com/OfficialSLC/status/1664616383681019904?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1664616383681019904%7Ctwgr%5E708f366d8bd3aaaabf7cfa068cb744d80276a285%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fsl-vs-afg-ms-dhoni-csk-matheesha-pathirana-sri-lanka-odi-debut-vs-afghanistan-1898258.html
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. श्रीलंका घरच्या मैदानावर असूनही पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांना याचा फायदा घेता आला नाही आणि सामना 6 गडी राखून गमावला. पदार्पणाच्या सामन्यात पथिराणाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते पाहता तो गोलंदाजी करणेच विसरल्याचे दिसत होते. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी त्याचा फडशा पाडला. त्याच्या चेंडूंवर धावा केल्या. तो श्रीलंकेचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 8.5 षटकात 66 धावा दिल्या.

55 धावा करणाऱ्या रहमत शाहची विकेट पथिराणाला मिळाली. त्याला मोठी विकेट मिळाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने 8.5 ओव्हरमध्ये 16 वाईड बॉल टाकले. पथिराणाने आयपीएलमध्ये 12 सामन्यात 19 विकेट घेतल्या, पण पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने मनसोक्त धावा दिल्या.
https://twitter.com/OfficialSLC/status/1664482671534440448?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1664482671534440448%7Ctwgr%5E708f366d8bd3aaaabf7cfa068cb744d80276a285%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fsl-vs-afg-ms-dhoni-csk-matheesha-pathirana-sri-lanka-odi-debut-vs-afghanistan-1898258.html
पथिराणाच्या खराब गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने 269 धावांचे लक्ष्य 19 चेंडू राखून 4 गडी गमावून आधीच गाठले होते. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 268 धावा केल्या. चरत अस्लंकाने सर्वाधिक 91 धावा केल्या. इब्राहिम झद्रानच्या 98 धावा आणि रहमत शाहच्या 55 धावांच्या जोरावर श्रीलंकेने दिलेले लक्ष्य अफगाणिस्तानने सहज गाठले.