WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी स्टीव्ह स्मिथवर संतापलेल्या अॅलन बॉर्डरने हे म्हटले


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. त्याचवेळी आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अॅलन बॉर्डर म्हणाले की, भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू आक्रमक क्रिकेट खेळतील, अशी अपेक्षा आहे. विशेषत: स्टीव्ह स्मिथकडून… तो म्हणाला की पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ विरोधी संघांसोबत अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात गेला आहे, जे योग्य नाही.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर असे मानतो की, खेळीमेळीचे वातावरण असले पाहिजे, पण अतिरेकी आक्रमकता योग्य आहे, असे मला वाटत नाही. तसेच, त्याने स्टीव्ह स्मिथचे उदाहरण दिले… तो म्हणाला की जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ भारतात कसोटी मालिका खेळत होता, तेव्हा स्टीव्ह स्मिथ भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या चेंडूचे कौतुक करत होता, पण मला ते योग्य वाटत नाही, कारण तुम्ही तिथे विरोधी संघासोबत सामना खेळत आहात, तुम्हाला जिंकायचे आहे. मी असतो तर मी आक्रमक क्रिकेट खेळण्यास प्राधान्य दिले असते.

अॅलन बॉर्डर म्हणाले की, ऑस्ट्रेलियाची क्रिकेट खेळण्याची पद्धत नेहमीच वेगळी राहिली आहे. मी नेहमीच आक्रमक क्रिकेटच्या बाजूने आलो आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही विरोधी संघातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. त्याचबरोबर ते म्हणाले की, न्यूझीलंड संघ हा क्रिकेट या प्रकारासाठी ओळखला जातो. यामुळे किवी संघाला ‘मिस्टर नाइस गाय’ असे संबोधण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असतील.