Foxconn Bengaluru : अॅपल भारतात दरवर्षी तयार करणार 2 कोटी स्मार्टफोन, ही आहे योजना


दिल्‍ली आणि मुंबईमध्‍ये स्‍टोअर उघडल्‍यानंतर दिग्गज टेक कंपनी Apple ने एक मोठी घोषणा केली आहे. आता अॅपल भारतात दरवर्षी 2 कोटी स्मार्ट फोन बनवणार आहे. कंपनी एप्रिलपासून आपल्या बंगळुरु युनिटमधून फोनचे उत्पादन सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने मास्टर प्लॅन तयार केला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो, तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनने Apple Inc साठी पुढील वर्षी एप्रिलपासून बंगळुरूमधील देवनहल्ली सुविधा येथे फोन बनवण्यास सुरुवात करेल. यामुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

13,600 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात हजारो रोजगाराच्या संधीही खुल्या होणार आहेत. या प्रकल्पादरम्यान सुमारे 50,000 नोकऱ्या निर्माण होणार आहेत. फॉक्सकॉनने तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यावर भारतात वर्षाला दोन कोटी आयफोन तयार होतील. यामुळे भारतात उत्पादनाबरोबरच खरेदी वाढण्याची शक्यता आहे.

आयटीआयआरची देवनहल्लीतील 300 एकर जमीन या वर्षी 1 जुलैपर्यंत फॉक्सकॉनला या प्रकल्पासाठी सुपूर्द केली जाईल. याशिवाय सरकार कंपनीला 5 दशलक्ष लिटर पाणी आणि वीजही देणार आहे. फॉक्सकॉनच्या प्रतिनिधींनी कर्नाटकचे उद्योगमंत्री पाटील यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. यावेळी कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे हे देखील उपस्थित होते.