रवींद्र जडेजाने केले हृदय जिंकणारे काम, भेट दिली ती बॅट ज्याने चेन्नईसाठी लगावला विजयी चौकार


चेन्नई सुपर किंग्सने IPL-2023 चे विजेतेपद पटकावले. यासह चेन्नईला पाचव्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यात यश आले. अंतिम फेरीत या संघाने गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नईला हा विजय सहजासहजी मिळाला नाही. या संघाने शेवटपर्यंत झुंज दिली आणि चेन्नई जिंकू शकणार नाही असे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर फासे फिरवत चेन्नईला विजय मिळवून दिला. या विजयानंतर जडेजाने हृदय जिंकणारी कामगिरी केली आहे.

चेन्नईला शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. मोहित शर्मा शेवटचे षटक टाकत होता. मोहितने शानदार गोलंदाजी करत चार अचूक यॉर्कर टाकले. यानंतर शेवटच्या दोन चेंडूंवर चेन्नईला विजयासाठी 10 धावांची गरज होती. जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.

यानंतर चेन्नई संघ आणि त्याच्या चाहत्यांना जागाच राहिली नाही. संपूर्ण स्टेडियमने जल्लोष केला. जडेजा या विजयाचा हिरो ठरला. विजयानंतर या हंगामात चेन्नई संघासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या अजय मंडलला जडेजाने खास भेट दिली. जडेजाने ज्या बॅटने चेन्नईला जिंकून दिले, ती बॅट भेट म्हणून दिली. याची माहिती अजयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1663957097430777858?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1663957097430777858%7Ctwgr%5Eaea17a14e4ec1ce757de3e9f2b30b92deafa281f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fravindra-jadeja-gift-his-winning-bat-to-ajay-mandal-after-ipl-2023-final-chennai-super-kings-gujarat-titans-csk-vs-gt-1894420.html
त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या बॅटचा फोटो पोस्ट करत अजयने लिहिले की, रवींद्र जडेजाने अंतिम सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा काढलेली बॅट भेट दिली. त्याबद्दल त्याने जडेजाचे आभार मानले. तसेच चेन्नई फ्रँचायझीचे आभार मानले ज्याने त्याला जडेजासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी दिली.

अजय मंडलचा जन्म मध्य प्रदेशात झाला. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये छत्तीसगडकडून खेळतो. अजय हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा फिरकीपटू आणि डावखुरा फलंदाज आहे. चेन्नईने अजयला या मोसमात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले, पण त्याला या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करता आले नाही.