Movies Download : आता टॉरेंटवरून डाउनलोड करू शकणार नाही चित्रपट ! बंद झाली ही मोठी वेबसाइट


तुम्हीही थिएटरमध्ये जाण्याऐवजी तुमच्या फोनवर बॉलीवूड आणि हॉलीवूडचे चित्रपट पाहत असाल, तर तुम्ही ते आता पाहू शकणार नाही. म्हणजेच, आता तुम्हाला थिएटरमध्ये जाण्यासाठी पैसे वाचवता येणार नाहीत आणि तुम्हाला नवीनतम चित्रपट पाहण्यासाठी तुमचे पैसे खर्च करावे लागतील. वास्तविक RARBG, जी सर्वात लोकप्रिय टोरेंट वेबसाइट्सपैकी एक आहे, ती आता बंद झाली आहे.

कंपनीने सर्व काम बंद केले असून नवीन प्रकाशनही थांबवले आहे. या सेवेच्या मालकाने वेबसाइटवर एक संदेश पोस्ट केला आहे की RARBG बंद केले जात आहे, कारण कोविड महामारी आणि युक्रेन युद्धामुळे बरेच कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

RARBG ही खूप जुनी पायरेट साइट आहे, जी 2008 मध्ये बल्गेरियन बिटटोरेंट ट्रॅकर म्हणून लॉन्च केली गेली होती. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना नवीनतम आणि सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट तसेच टीव्ही मालिका ऑफर करण्यासाठी ती लोकप्रिय झाली होती. यामध्ये तुम्हाला इंग्रजी कंटेंट बघायला मिळतो.

कंपनीने आपली सेवा बंद करण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. साइटवर पोस्ट केलेल्या संदेशानुसार, कोविडमुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही अजूनही कोविड पॉझिटिव्ह आहेत. बरेच लोक युक्रेन युद्धात लढत आहेत आणि कंपनी युरोपमधील डेटा सेंटरसाठी उच्च किंमत देऊ शकत नाही.

या टोरेंट वेबसाईटवर भारतात आधीच बंदी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय लोकांवर अधिक दिसून येईल. 2019 मध्ये पायरसीवर कारवाई करत दिल्ली उच्च न्यायालयाने 30 टोरेंट वेबसाइट्सवर बंदी घातली होती. RARBG देखील त्यापैकी एक होती. अशा साइट्स काही चित्रपट निर्मिती कंपन्यांच्या कॉपीराइटचे उल्लंघन करणारी सामग्री देत ​​होत्या.