WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियन संघात या भारतीयाची चर्चा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी खळबळ


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल अजून सुरू झालेली नाही आणि ऑस्ट्रेलियन टीममध्ये घबराट पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी घरात घुसून त्यांना गुडघ्यापर्यंत आणणाऱ्या भारतीय खेळाडूबाबत कांगारू संघात गोंधळ सुरू आहे. आम्ही बोलतोय ते चेतेश्वर पुजाराबद्दल, ज्याच्याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने कमिन्स अँड कंपनीला सावध राहण्याचा खास सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या पाँटिंगने कांगारू गोलंदाजांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पुजाराला हलक्यात न घेण्याची सूचना केली आहे. त्याने आपल्या संघाला भारताच्या या टेस्ट स्पेशालिस्टपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

रिकी पाँटिंग म्हणाला, ऑस्ट्रेलियन संघ यावेळी पुजाराबद्दल चर्चा करत असेल. पुजाराची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्याने ऑस्ट्रेलियन संघाला दिलेल्या जुन्या जखमा. त्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्यात खूप मदत केली आहे. दरम्यान पाँटिंगला पुजाराची भीती वाटण्याचे खरे कारण म्हणजे भारताचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा, ज्यामध्ये पुजारा खेळलेल्या मालिकेत दगडासारखा क्रीझवर उभा होता. भारतासाठी सामना वाचवायचा की जिंकायचा, या दोन्ही बाबतीत त्याने आपली भूमिका चोख बजावली.

जरी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारतासोबत खेळायची आहे. पण, पुजारा येथेही त्यांच्यासाठी धोका ठरू शकतो. कारण बाकीचे भारतीय खेळाडू नुकतेच इंग्लंडला पोहोचले असावेत. मात्र पुजारा गेल्या 2 महिन्यांपासून तेथे काउंटी क्रिकेट खेळत होता. यादरम्यान त्याने 6 सामन्यांच्या 8 डावात 3 शतकांसह 545 धावा केल्या.

पुजारा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धोका असल्याचे वर्णन करण्याव्यतिरिक्त, रिकी पॉन्टिंगने हार्दिक पांड्याला WTC फायनलसाठी न निवडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. पाँटिंग म्हणाला की मला माहित आहे की हार्दिकचे शरीर कसोटी क्रिकेटसाठी नाही, परंतु तरीही मला वाटते की तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर असू शकतो. सामन्यात फरक करणारा तो खेळाडू आहे.

दरम्यान हार्दिक पांड्या 2018 पासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. फिटनेसच्या समस्येमुळे त्याने स्वतः क्रिकेटच्या या फॉरमॅटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.