अल्लू सिरिश हे तेलगू चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आता दीर्घ विश्रांतीनंतर सिरिश पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे. 30 मे 1987 रोजी जन्मलेला अल्लू सिरिश हा दक्षिणेतील मोठ्या चित्रपट कुटुंबातील आहेत. त्याचा भाऊ अल्लू अर्जुन आहे, ज्याचा दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. दुसरीकडे, अल्लू सिरिशचे वडील अल्लू अरविंद हे दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माते आहेत.
Allu Sirish : अल्लू सिरिश कोण आहे, ज्याचे वडील आहेत दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता आणि भाऊ मोठा सुपरस्टार
अल्लू सिरिशला चित्रपटांमध्ये येण्याची फारशी इच्छा नव्हती, पण एका अभिनेत्याच्या कुटुंबात वाढल्यामुळे सिरिशने अभिनयाच्या जगातही पाऊल ठेवले. 2013 मध्ये सिरिशने ‘गौरवम’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्याने 2014 मध्ये ‘कोठा जनता’, 2016 मध्ये सरीरस्तु सुभमस्तु आणि 2017 मध्ये ओक्का क्षनम या सिनेमांमध्ये काम केले. अल्लू अर्जुनला जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली ती त्याला मिळवता आली नाही.
अल्लू सिरिश काही काळ त्याच्या नवीन स्टार्टअपमध्ये व्यस्त होता. त्याला व्यवसायात खूप रस आहे आणि कपड्यांच्या व्यवसायात त्याने बरीच गुंतवणूक केली आहे. मात्र, प्रदीर्घ चित्रपट ब्रेकनंतर अल्लू सिरिशही चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. सिरिश दिग्दर्शक सॅम अँटोनच्या पुढील तेलगू चित्रपटात दिसणार आहे. बडी असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर शेअर करत सिरिशने त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
अल्लू सिरिशच्या कुटुंबात एक-दोन नव्हे तर 10 हून अधिक कलाकार आहेत. सध्या राम चरण आणि अल्लू अर्जुन हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले कलाकार आहेत. निर्माते अरविंद अल्लू यांचा मुलगा अल्लू सिरिश यांचे आजोबा देखील एक उत्तम विनोदी अभिनेते होते. ज्यांचे नाव अल्लू रामलिंगय्या होते. तर वडील अल्लू अरविंद निर्माता आहेत आणि चिरंजीवी काका आहेत. अशा बड्या स्टार्सच्या कुटुंबातील अल्लू सिरिश एका मोठ्या हिटची वाट पाहत आहे.