IPL 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी होणार होता. पण, आता तो 29 मे रोजी म्हणजेच आज खेळवला जाणार आहे. कारण काल पाऊस पडल्यामुळे हा सामना राखीव दिवशी गेला आहे. 28 मे रोजी आयपीएल फायनलचे ठिकाण असलेल्या अहमदाबादमध्ये पाऊस सुरू झाला, तो थांबला नाही, परिणामी सामना पुढे ढकलावा लागला. आता 29 मे रोजी होणारा सामना हा निव्वळ योगायोग आहे की चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचे नशीब त्याच्या विरोधात गेले आहे, हे सांगता येणार नाही.
IPL 2023 Final : 29 मे रोजी फायनल, निव्वळ योगायोग की धोनीचे नशीब गेले त्याच्या विरोधात?
बरं, आपण हे का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर त्यामागे गुजरात टायटन्सचे 29 मे या तारखेशी असलेले कनेक्शन आहे. हार्दिक पांड्या आणि त्याच्या टीमसाठी ही तारीख खूप खास आहे, जशी 28 मेची तारीख चेन्नई सुपर किंग्ससाठी खास होती.
28 मे रोजी होणाऱ्या फायनलपूर्वीच अनेक क्रिकेटपंडितांनी चेन्नई सुपर किंग्जला जेतेपदाचे दावेदार म्हणून घोषित केले होते. प्रत्येकाची स्वतःची कारणे होती. पण, 28 मे या तारखेलाही कनेक्शन जोडण्यात आले. खरं तर, 2011 मध्ये या तारखेला, चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण केले आणि असे करणारा पहिला संघ बनला.
आयपीएल 2023 चा अंतिम सामना आता 29 मे रोजी होणार आहे. याच तारखेला गुजरात टायटन्स प्रथमच आयपीएल चॅम्पियन बनला होता. त्याने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे हे मैदानही तेव्हा अहमदाबादचेच होते, जिथे या हंगामाचा अंतिम सामनाही खेळला जात आहे.
अशा स्थितीत हार्दिक पांड्याला जेतेपदाची बरोबरी साधण्याचा हा प्रयत्न ब्रह्मांडाने केला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा नशिबाचा यू टर्न आहे, जो एमएस धोनीकडून हार्दिक पांड्याकडे गेला आहे. कारण ज्या तारखेला त्याने जेतेपद पटकावले त्याच तारखेला अहमदाबादच्या त्याच मैदानावर त्याला आता बचावाची संधी मिळाली आहे.
असे असले तरी, सामना 29 मे रोजी म्हणजेच राखीव दिवशी झाला नाही, तर त्या बाबतीत गुजरात टायटन्स विजयी होईल.