T-series Success Story : एकेकाळी दिल्लीत फळे विकायचे गुलशन कुमार, अशा प्रकारे घातला देशातील सर्वात मोठ्या संगीत कंपनीचा पाया


T-Series ही आज देशातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी आहे, पण तिचा प्रवास एखाद्या उदाहरणापेक्षा कमी नाही. जे सांगते की काहीही अशक्य नाही. 2400 कोटींची निव्वळ संपत्ती असलेल्या कंपनीचे YouTube चॅनल देखील जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेले चॅनल आहे. हे देशातील सर्वात मोठे संगीत लेबल आहे. पण टी-सीरिजने हा पराक्रम असाच केला नाही. यासाठी संघर्षाची एक मोठी कहाणी आहे. T-Series चा प्रवास कसा सुरु झाला ते जाणून घेऊया.

टी-सीरीजचा पाया रचणारे गुलशन कुमार यांचे वडील चंद्रभान कुमार दुआ 1947 मध्ये पाकिस्तानातून भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. दिल्लीच्या दर्यागंजमध्ये फळे आणि ज्यूस विकायला सुरुवात केली. गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे 1956 रोजी झाला. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गुलशन यांनी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली.
https://www.neopress.in/wp-content/uploads/2018/05/1539c70fbef255305b62f870764c6484.jpg
फळ आणि ज्यूसच्या व्यवसायाव्यतिरिक्त गुलशन कुमार यांनी ऑडिओ कॅसेट विकायला सुरुवात केली. या व्यवसायातून पैसे गोळा केल्यानंतर त्यांनी 11 जुलै 1983 रोजी दिल्लीत सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही संगीत निर्मिती कंपनी सुरू केली.

हा तो काळ होता, जेव्हा लोकांना डिस्क्समधून गाणी ऐकण्याची आवड होती, परंतु त्यांनी जपानी कॅसेट प्लेयर्स बाजारात पाहिले आणि त्यांना खात्री होती की एक दिवस कॅसेट डिस्कची जागा घेईल. त्यामुळे ते कॅसेटवर जाण्याची तयारी करू लागले.

त्या काळात ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया आणि म्युझिक इंडिया लिमिटेड या कंपन्यांचा दबदबा होता. कॅसेट आणल्यानंतर गुलशन कुमार यांची कंपनी T-Series हळूहळू मध्यमवर्गीयांमध्ये आपले स्थान निर्माण करू लागली. तो सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता.

किरकोळ विक्रेत्याला व्यवसायात फायदा मिळणे खूप महत्त्वाचे आहे, हे गुलशन कुमार यांना चांगलेच समजले. त्यामुळे किरकोळ विक्रेत्याकडून कॅसेट्स विकता येत नसल्याने त्या परत घेण्याची योजना त्यांनी आखली. या रणनीतीमुळे गुलशन कुमार यांचे किरकोळ विक्रेत्याशी असलेले नाते अधिक घट्ट झाले. कंपनीला पुढे नेण्यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी एक कॉपीराइट कायदा होता, ज्या अंतर्गत कोणतेही गाणे रिलीज झाल्यानंतर 3 वर्षांनी पुन्हा रेकॉर्ड केले जाऊ शकते. याचा फायदा गुलशन कुमार यांनी घेतला. गाण्याला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते दुसऱ्या गायकाने रेकॉर्ड करून कॅसेटच्या स्वरूपात विकले. या रणनीतीने कंपनीला मोठ्या उंचीवर नेले. त्यामुळे भक्ती असो वा चित्रपट, टी-सिरीजच्या कॅसेट्स घराघरात पोहोचू लागल्या.

सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल या गायकांना त्यांनी संधी दिली. हळूहळू त्या काळातील दिग्गज गायक T-Series साठी आवाज देऊ लागले आणि कंपनीने इतिहास रचला. जेव्हा कंपनी आपल्या उंचीवर होती, तेव्हा 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी परिसरात काही शूटर्संनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यात त्यांचा मृत्यु झाला.

या धक्क्याने संपूर्ण कुटुंबच मोडकळीस आले. पण परिस्थिती हाताळत मुलगा भूषण कुमारने बिझनेसची कमान हाती घेतली आणि टी-सिरीजला अशा ऊंचीवर नेऊन ठेवले ज्याचे स्वप्न त्यांचे वडील गुलशन कुमार यांनी पाहिले होते.