RBI : दररोज जमा होणाऱ्या 2000 च्या नोटांचा डेटा बँकांनी ठेवावा, आरबीआयने जारी केल्या सूचना


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना दररोज जमा होणाऱ्या 2,000 रुपयांच्या नोटांचा डेटा राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासंबंधीच्या सूचना आरबीआयने 22 मे रोजी जारी केल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना काउंटरवर 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच दिली जाईल. नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी दिला जाईल.

दास म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय स्वच्छ नोट धोरणांतर्गत घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. 23 मे पासून इतर मूल्यांच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा कोणत्याही बँकेत एकावेळी 20,000 रुपयांपर्यंत असेल. दास म्हणाले, आम्ही नोटा बदलून घेताना येणाऱ्या अडचणींवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.