कोरियामध्ये होणारा पहिल्यांदाच भारतीय चित्रपटाचा रिमेक, यापूर्वीच 7 भाषांमध्ये बनला ‘दृश्यम’


‘दृश्यम’च्या नावावर आणखी एका यशाची भर पडली आहे. आता अजय देवगणच्या चित्रपटाचा कोरियन रिमेक बनणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये याची घोषणा करण्यात आली. पॅनोरमा स्टुडिओ आणि अँथॉलॉजी स्टुडिओने या चित्रपटासाठी भागीदारी केली आहे. कोरियन भाषेत भारतीय चित्रपटाचा रिमेक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘दृश्यम’ हा पहिला मल्याळम भाषेत 2013 मध्ये बनला होता, ज्यामध्ये मोहनलाल मुख्य भूमिकेत होते. आतापर्यंत हा चित्रपट 7 भाषांमध्ये बनवला गेला आहे, त्यापैकी तीन परदेशी भाषांचाही समावेश आहे. आता तो 8व्यांदा कोरियन भाषेत बनवला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता ‘दृश्यम’ कोरियन भाषेत बनवण्यात येणार आहे. Panorama Studios-Anthology Studios ने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत घोषणा केली आहे. कुमार मंगत पाठक यांच्या पॅनोरमा स्टुडिओ आणि अँथॉलॉजीने कोरियामधील दृष्यम फ्रँचायझीचा रीमेक करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली.

दृश्यम 2015 साली हिंदीमध्ये आला होता. त्यात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि ऋषभ चढ्ढा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता, जो आता या जगात नाही. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 38 कोटींमध्ये बनला होता आणि त्याने जगभरात 111 कोटींचा गल्ला जमवला होता. त्याचा दुसरा भाग 2022 मध्ये रिलीज झाला होता.

‘दृश्यम’ मल्याळम भाषेत 2013 मध्ये बनवण्यात आला होता. हा क्राइम-थ्रिलर चित्रपट जीतू जोसेफने लिहिला आणि दिग्दर्शित केला. मोहनलाल आणि मीना यांच्याशिवाय अंसीबा हसन, एस्थर अनिल, कलाभवन शाजॉन, आशा शरथ, सिद्दीकी, रोशन बसीर आणि नीरज माधव सहाय्यक भूमिकेत होते. आशीर्वाद सिनेमाजचे अँटोनी पेरुम्बावूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. यानंतर 2021 मध्ये ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला.

चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर ‘दृश्यम’ चित्रपटाचा अन्य चार भारतीय भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. हे कन्नडमध्ये दृश्य (2014), तेलुगुमध्ये दृश्यम (2014), तमिळमध्ये पापनासम (2015) म्हणून आणि हिंदीमध्ये दृश्यम (2015) म्हणून रिलीज झाले. सिंहली भाषेत (श्रीलंका) धर्मयुद्ध (2017) आणि नंतर चिनी भाषेत Sheep without a Shepherd (2019).

चीनमध्ये रिमेक झालेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. सप्टेंबर 2021 मध्ये इंडोनेशियन रिमेकची घोषणा करण्यात आली. इंडोनेशियन भाषेत रिमेक केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. कोरियन रिमेकची घोषणा मे 2023 मध्ये करण्यात आली आणि कोरियनमध्ये रिमेक होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.