IPL 2023 : IPL विजेत्यावर पडणार पैशांचा पाऊस, उपविजेतेही होणार मालामाल, जाणून घ्या यंदाच्या मोसमातील बक्षीस रक्कम


IPL 2023 आता काही दिवसात संपणार आहे. 23 मेपासून प्लेऑफलाही सुरुवात होणार आहे. पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यानंतर, 24 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स मुंबई, बेंगळुरू किंवा राजस्थानमधील कोणत्याही एका संघासोबत एलिमिनेटर सामना खेळेल. आता जसजसा आयपीएलचा अंतिम सामना जवळ येत आहे तसतशी आयपीएलच्या विजेत्या संघाची बक्षीस रक्कम जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. चला तर मग एक नजर टाकूया या हंगामातील विजेत्या ते चौथ्या क्रमांकाच्या संघाला किती पैसे मिळतील.

आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम दिली जाईल. त्याचबरोबर यानंतर उपविजेत्या संघालाही 13 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. इतकंच नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असणाऱ्या संघांना प्रत्येकी 7 कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएल 2023 मध्ये जो खेळाडू ऑरेंज कॅप जिंकेल म्हणजेच स्पर्धेत सर्वाधिक धावा करेल, त्याला 15 लाख रुपये दिले जातील.

आयपीएल 2023 मध्ये पर्पल कॅप जिंकणाऱ्या म्हणजेच सर्वाधिक विकेट घेणार्‍या खेळाडूला केवळ 15 लाख रुपये मिळतील.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात उदयोन्मुख खेळाडू ठरणाऱ्या खेळाडूला 20 लाख रुपयांची भरघोस रक्कम दिली जाईल.

आयपीएल 2023 मध्ये सुपर स्ट्रायकर बनणाऱ्या खेळाडूला 15 लाख रुपये दिले जातील.

आयपीएल 2023 मधील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरणाऱ्या खेळाडूला 12 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.