थलपथी विजय बनला भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता, अभिनेत्याचे मानधन चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त


साऊथ इंडस्ट्रीत सध्या एकापेक्षा एक सुपरस्टार आहेत. पण थलपथी विजय हा साऊथ सिनेमाचा जीव आहे. थलपथी विजयला साऊथच्या चाहत्यांचे अपार प्रेम मिळते. अभिनेत्याचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करतात. थलपथी विजयने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र आता थलपथी विजयने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ज्यानंतर बॉलिवूड स्टार्स त्यांच्यासमोर कमी दिसणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, थलपथी विजय आता भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. म्हणजेच विजयला भारतात सर्वाधिक मानधन दिले जाते. एका रिपोर्टनुसार, विजय त्याच्या आगामी चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन घेणार आहे. जर हे वृत्त खरे ठरले, तर आजपर्यंत भारतात बॉलीवूडपासून दक्षिणेकडील चित्रपटांपर्यंत कोणीही चित्रपट करण्यासाठी इतकी मोठी रक्कम घेतलेली नाही.

दुसरीकडे, 200 कोटींचे बजेट असलेले चित्रपट मोठ्या रकमेचे चित्रपट मानले जातात. इतकेच नाही, तर बहुतांश चित्रपटांचे बजेट 200 कोटीही नसते. म्हणजे थलपथी विजयची फी चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त असणार आहे. लिओनंतर आता विजय व्यंकट प्रभूसोबत काम करणार आहे. व्यंकट प्रभू विजयसोबत ‘थलापथी 68’ वर सतत काम करत आहेत. थलपथी विजयने नुकतेच आपली मानधन वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजय पूर्वीपर्यंत 80 कोटी रुपये घेत होता. मात्र लिओमुळे त्याला साऊथपासून हिंदी चित्रपटसृष्टीत भरभरून प्रेम मिळाले आहे. लिओ हा एक गँगस्टर थ्रिलर चित्रपट आहे. थलपथी विजयच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज लावणे फार कठीण आहे. त्याच्यासाठी चाहत्यांची क्रेझ अनेकदा पाहायला मिळते. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा त्याच्या आगामी चित्रपटांकडे लागल्या आहेत.