कोणत्याही देशाच्या प्रगतीत बँकेची भूमिका महत्त्वाची असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटल्या जाणाऱ्या शेती, उद्योग, रस्ते, वीज, दूरसंचार, शिक्षण, रिअल इस्टेटच्या विकासासाठी बँक हा महत्त्वाचा घटक आहे. केवळ जनताच नाही, तर अनेक सरकारे आहेत जी विकासासाठी बँकांकडून कर्ज घेतात. एखाद्या देशाचे बँकिंग क्षेत्र जेवढे विकसित असेल, तेवढा देश अधिक प्रगती करतो आणि अशा देशांचे नाव समोर आले की सर्वात पहिले नाव येते ते अमेरिकेचे. पण तुम्हाला माहित आहे का की या देशात एक अनोखी बँक देखील आहे. ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.
OMG ! जगातील सर्वात लहान बँक, जिथे फक्त दोन लोकच करतात काम, अशी करतात कमाई
आम्ही असे म्हणत आहोत, कारण या विकसित देशात या बँकेकडे फक्त काही कोटी रुपये आहेत. एकूण मालमत्तेवर नजर टाकली, तर फक्त 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, हे चलन भारतीय रुपयात पाहिल्यास ते सुमारे 25 कोटींच्या जवळपास आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतक्या छोट्या मालमत्तेमुळे ही अधिकृतपणे या देशातील सर्वात लहान बँक आहे. येथे ज्या बँकेबद्दल बोलले जात आहे त्याचे नाव केंटलँड फेडरल सेव्हिंग्ज अँड लोन आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बँकेची स्थापना 1920 मध्ये झाली होती. या बँकेची स्थापना केंटलँड, इंडियाना येथे सध्याच्या सीईओच्या आजोबांनी केली होती. त्यावेळपासून आजतागायत केवळ तीन प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये बचत खाते उघडणे, गृहकर्ज देणे आणि ठेव प्रमाणपत्र उघडणे यासारख्या सेवांचा समावेश आहे. या बँकेचे सीईओ सॅमसन सांगतात की, येथील ग्राहकांना त्यांच्या पैशाने पूर्णपणे सुरक्षित वाटत होते. कारण 1920 मध्ये बँक स्टॉक एक्स्चेंजच्या पडझडीतही ते बंद झाले नाही. त्यामुळे बँकेवरील ग्राहकांचा विश्वास आणखी वाढला आहे.
त्यांच्या मुलाखतीत, सीईओने पुढे सांगितले की, त्यांना वाटते की ही बँक त्यांच्यासोबत बंद होईल कारण काळानुसार बऱ्याच गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत. आजही दोनच लोक मिळून ही बँक चालवत आहेत. अशी जुनी बँक आजही फक्त दोन लोक चालवत आहेत. या बँकेत अजूनही काही लोकांची बचत खाती असून काहींची कर्जे सुरू आहेत. याशिवाय बँकेकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही.