तारक मेहताचे निर्माते असित मोदी अडचणीत, अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने दाखल केला गुन्हा


तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित मोदी अडचणीत सापडले आहेत. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने आता असित मोदीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जेनिफरने असित मोदी आणि त्यांच्या टीमवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने असित मोदीविरोधात मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जेनिफर मिस्त्रीने असित मोदींविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत जेनिफरने निर्माता असित मोदी आणि क्रूच्या काही सदस्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच या प्रकरणाशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जातील.

असित मोदींशिवाय जेनिफर मिस्त्रीने सोहेल रमाणी आणि जतीन यांच्यावरही गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीने याप्रकरणी डीसीपी झोन ​​10 यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून जबाब नोंदवले जात आहेत.

तारक मेहता ही मालिका गेल्या काही दिवसांपासून वादांमुळे चर्चेत आहे. जेनिफरने असित मोदींवर आरोप केला आहे की, तो तिला खोलीत एकटीला बोलवत असे. एकदा तिच्या ओठांवर अश्लील कमेंटही केली होती. अभिनेत्री म्हणते की, एकदा रजा घेतल्यानंतर सेटवरही तिला वाईट वागणूक मिळू लागली.

मात्र, असित मोदी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे असित मोदी यांच्या टीमचे म्हणणे आहे. तारक मेहताच्या निर्मात्यांनी अभिनेत्रीच्या वागण्यावर आणि काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.