समुद्राखाली सापडला 7000 वर्षे जुना रस्ता, शास्त्रज्ञांनी सांगितले त्याचे वैशिष्ट्ये


समुद्राखाली रस्ता असू शकतो का? तर उत्तर आहे- होय. शास्त्रज्ञांनीही ते सिद्ध केले आहे. समुद्रात 7000 वर्षे जुना रस्ता सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे. संशोधन करणाऱ्या जादार क्रोएशिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूमध्य समुद्राच्या भूमीवर हा रस्ता शोधला आहे. ते म्हणतात, हा रस्ता समुद्रसपाटीपेक्षा 4 ते 5 मीटर खोल सापडला आहे. हा प्रागैतिहासिक रस्ता आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात या रस्त्याबद्दल अनेक रंजक माहिती उघड केली आहे, जाणून घ्या या रस्त्याशी संबंधित काही खास गोष्टी आणि तो इथे कसा बनवला गेला.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, दक्षिण क्रोएशियाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर एक रस्ता सापडला आहे. तो सुमारे 7 हजार वर्षे जुना आहे. या रस्त्याचा संबंध हावर संस्कृतीची वस्ती असलेल्या प्रागैतिहासिक काळापासून असल्याचे दिसते. ते म्हणतात की मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याचे अवशेष समुद्रात कसे टिकून राहिले.

संशोधनाबाबत आश्‍चर्यकारक बाब म्हणजे समुद्राच्या ज्या भागात हा रस्ता सापडला आहे, त्याच्यावर लाटांचा फारच कमी परिणाम झाला आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञांना त्याचे अवशेष सहज सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, कार्बन डेटिंग आणि पुरातत्व मोहिमेवरून असे समजले आहे की येथे 4900 वर्षांपूर्वी वस्ती होती.

शास्त्रज्ञांनी त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की कार्बन डेटिंगवरून असे दिसून आले आहे की लोक 7000 वर्षांपूर्वीपासून येथे फिरत होते. हे निओलिथिक हावर संस्कृतीत बांधले गेले असावे. या संस्कृतीतील बहुतेक लोक शेतकरी आणि मेंढपाळ होते. ते समुद्राच्या किनाऱ्यावर राहत होते. या बेटाच्या आसपास इतर संस्कृतीचे लोक राहत होते. त्याचबरोबर त्यांनी बांधलेली रचनाही त्याचाच पुरावा आहे.

समुद्राखाली सापडलेल्या हजारो वर्षे जुन्या रस्त्याची ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत. लोक म्हणतात, समुद्राखाली मिळालेला रस्ता आश्चर्यचकित करणारा आहे.