IPL 2023 : केकेआरच्या विजयात नितीश राणाकडून झाली ‘गलती से मिस्टेक’, या मोठ्या चुकीसाठी झाला दंड


ईडन गार्डन्सवर 8 मे रोजी संध्याकाळी खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरच्या हृदयात वसंत फुलला असेल. संघाने पंजाब किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. तसेच स्पर्धेत त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. पण, जेव्हा मैदानावर या सर्व गोष्टींची स्क्रिप्ट लिहिली जात होती, त्याचवेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणाने चूक केली. स्लो ओव्हर रेटची काळजी घ्यायला तो विसरला. परिणामी त्याला दंड ठोठावण्यात आला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात नितीश राणाने चूक केली. कारण, कर्णधार म्हणून त्याला स्लो ओव्हर रेटची काळजी घ्यायला पाहिजे होती. अशा परिस्थितीत त्याला आयपीएल आचारसंहितेनुसार दंड ठोठावण्यात आला आहे.

स्लो ओव्हर रेटशी संबंधित KKR कर्णधार नितीश राणाची ही पहिली चूक असल्याने त्याच्या मॅच फीमधून 12 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश राणा यांनी मॅच रेफरीसमोर स्लो ओव्हर रेटशी संबंधित आपली चूक मान्य केली, त्यामुळे या प्रकरणी पुढील सुनावणीची गरज नव्हती.

तसे, आयपीएल 2023 मध्ये नितीश राणाला दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान त्यांच्या मॅच फीमध्ये 25 टक्के कपात करण्यात आली होती. त्याच्या फीमध्ये ही कपात मुंबईचा गोलंदाज हृतिक शोकीनशी सामन्यादरम्यान झालेल्या भांडणामुळे करण्यात आली होती.

स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आलेला नितीश राणा या मोसमातील पहिला कर्णधार नाही. पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयी सामन्यात 38 चेंडूत 51 धावांची उत्कृष्ट खेळी करणाऱ्या राणाआधी हार्दिक पांड्या, फाफ डू प्लेसिस, केएल राहुलसारख्या कर्णधारांनाही हा दंड सोसावा लागला आहे.