प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांसारख्या कलाकारांचा अभिनय असलेल्या आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. टीझरपेक्षा ट्रेलर अधिक दमदार आहे. प्रभास भगवान रामच्या पात्रात आपली छाप सोडताना दिसत आहे, तर दोन दृश्यांमध्ये रावण बनलेला सैफ देखील महफिल लुटताना दिसत आहे.
Adipurush Dialogues : अंगावर शहारे उभे करतात आदिपुरुषाचे हे डायलॉग्ज
मनोज मुंतशीर यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. ट्रेलरमध्ये एक-दोन नाही, तर असे पाच डायलॉग्स आहेत, जे पॉवरफुल वाटतात. प्रभू रामची भूमिका साकारणाऱ्या प्रभासने सर्वात दमदार संवाद बोलला आहे. बाहुबलीप्रमाणे या चित्रपटातही शरद केळकरने प्रभासला हिंदीत आवाज दिला आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरीची शैली सगळ्यांना आधीच माहिती आहे.
ट्रेलरमध्ये आहेत हे दमदार डायलॉग्ज
- ‘जानकी में मेरे प्राण बसते हैं और मर्यादा मुझे अपने प्राणों से भी अधिक प्रिय है’- प्रभास
- ‘हम जन्म से नहीं कर्म से छोटे या बड़े होते हैं’- प्रभास
- ‘राघव ने मुझे पाने के लिए शिव धनुष तोड़ा था, अब उन्हें रावण का घमंड तोड़ना होगा.’- कृति सेनन
- ‘आज मेरे लिए मत लड़ना, उस दिन के लिए लड़ना, जब इतिहास में तुम्हारा नाम पढ़कर सम्मान से सिर झुक जाएंगे…लड़ोगे..तो आगे बढ़ो और गाड़ दो अहंकार की छाती में विजय का भगवा ध्वज’- प्रभास
टीझरच्या तुलनेत ट्रेलरमध्ये VFX आणि अॅनिमेशनमध्ये किती काम झाले आहे हे सांगणे कठीण आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात, तुम्हाला अनेक दृश्यांमध्ये भरपूर VFX दिसतील. कलाकारांच्या संवाद आणि पार्श्वसंगीतात VFX चा हलकापणा दडलेला असला तरी चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि जय श्री राम जय श्री रामचा आवाज प्रेक्षकांना भुरळ घालण्यास पुरेसा आहे.