भाईजानला टक्कर देण्यासाठी आला मोईद्दीन भाई, रजनीकांतचा ‘लाल सलाम’मधील फर्स्ट लूक झाला व्हायरल


आत्तापर्यंत तुम्ही ‘किसी का भाई किसी की जान’च्या भाईजानबद्दल खूप चर्चा ऐकल्या असतील. पण आता भाईजानला टक्कर देण्यासाठी नवा भाई आला आहे. या भाईने एंट्री घेताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या भाईच्या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे. हा भाईजान दुसरा कोणी नसून साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि चाहत्यांचा लाडका रजनीकांत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘लाल सलाम’ या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या लूकमध्ये तो अप्रतिम दिसत आहे आणि तो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.


रजनीकांतचा हा फोटो लायका प्रोडक्शनच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘सर्वांचा लाडका भाई मुंबईत आला आहे. थलैवा सुरू होणार आहे. लाल सलाममध्ये मोईदीनच्या भूमिकेत सुपरस्टार रजनीकांत. अशातच त्याच्या या फोटोवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त कमेंट येत आहेत.

रजनीकांत यांच्या लाल सलाम या चित्रपटाचे पहिले पोस्टर्स इंग्रजी आणि तमिळमध्ये रिलीज करण्यात आले आहेत. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मात्र, या चित्रपटात रजनीकांत यांचा कॅमिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाल सलाम या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे संगीत ए.आर. रेहमान यांनी दिले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण हा चित्रपट 2023 मध्येच प्रदर्शित होऊ शकतो असे बोलले जात आहे. अशाप्रकारे रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त सरप्राईज येणार आहे.