Shahid Afridi on PM Modi : पीएम मोदींच्या उपस्थितीत होऊ शकत नाही पाकिस्तानचे भले, लाइव्ह शोमध्ये बरळला शाहिद आफ्रिदी


शाहिद आफ्रिदीचे भारताविरुद्ध वक्तव्य करणे काही नवीन नाही. तो अनेकदा भारत आणि त्यांच्या धोरणांवर टीका करतो. पाकिस्तानचा माजी कर्णधार अनेकदा पीएम मोदींविरोधातही वक्तव्य करत आहे. शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा भडकला असून त्याने पीएम मोदींविरोधात वक्तव्य केले आहे. यावेळी शाहिद आफ्रिदीने आशिया चषक स्पर्धेच्या मुद्द्यावरून खळबळ उडवून दिली. त्याने थेट पंतप्रधान मोदींवरच प्रश्न उपस्थित केला आणि जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत पाकिस्तानचा फायदा होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

आशिया कपच्या मुद्द्यावर शाहिद आफ्रिदीला प्रश्न विचारण्यात आला होता. जर आशिया चषक झाला नाही, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विश्वचषकाबाबत काय भूमिका घेणार? हा प्रश्न ऐकून शाहिद आफ्रिदी अचानक भडकला. शाहिद आफ्रिदीने पीएम मोदींबद्दल म्हटले आहे की, जोपर्यंत ते पंतप्रधान आहेत, तोपर्यंत पाकिस्तानचे काहीही भले होऊ शकत नाही.

आफ्रिदी म्हणाला, पाहा, मोदींकडून पाकिस्तानला फायदा होईल, असे काही करण्याची अपेक्षा करू नका. मोदी फक्त आमचे नुकसानच करतील, ते आमच्या फायद्यासाठी काहीही करणार नाहीत. शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान मोदींना महिनाभर असे आवाहन केले होते की पाकिस्तानचा सामना होऊ द्या आणि आता त्यानंतर त्याने असे वक्तव्य केले आहे.

आशिया कप सप्टेंबरमध्ये होणार असला तरी ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाकिस्तान ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्यावर ठाम आहे. त्याचवेळी बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता ही स्पर्धा होणार नाही आणि त्याऐवजी बीसीसीआय पाच देशांची स्पर्धा आयोजित करू शकते, असे वृत्त आहे. असे झाल्यास पाकिस्तानही भारतात येण्यास नकार देण्याची शक्यता आहे.

पीसीबी सतत अशा धमक्या देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यावर्षी विश्वचषक ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. आता बीसीसीआय आणि पीसीबीची भूमिका काय असते हे पाहावे लागेल.