गुजरात टायटन्स 12 गुणांसह अव्वल असेल, परंतु कर्णधार हार्दिक पांड्याला कदाचित कळले असेल की त्याने 20 लाखांच्या किमतीच्या फलंदाजाला बाहेर करून स्वतःच्या पायावर दगड मारुन घेतला. गुजरातने 9 पैकी 6 सामने जिंकले. दिल्ली कॅपिटल्सने गेल्या सामन्यात गुजरातचा 5 धावांनी पराभव केला. गुजरात पुनरागमन करण्यात माहीर आहे, पण गेल्या 4 सामन्यांमध्ये संघाच्या संयोजनात काहीतरी गडबड आहे. ज्यामुळे संघाचे नुकसान होऊ शकते.
IPL 2023 : हार्दिक पांड्याने घेतली 20 लाखाच्या खेळाडूची जागा आणि झाला खेळ खल्लास!
गेल्या 4 सामन्यांमध्ये साई सुदर्शन गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला नाही. पहिल्या 5 सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केल्यानंतर सुदर्शन पुढील 4 सामन्यांमधून बाहेर पडला. सुदर्शनने 5 सामन्यात 176 धावा केल्या. त्याची सरासरी 44 च्या जवळ आहे. सुदर्शनला बेंचवर ठेवून पांड्यानेच गुजरातचे कॉम्बिनेशन बिघडवले. हार्दिकच्या सरासरीबद्दल बोलायचे तर त्याने 8 सामन्यात 30.43 च्या सरासरीने 213 धावा केल्या. तर विजय शंकरने 7 सामन्यात 41 च्या सरासरीने 205 धावा केल्या.
पांड्याने सुदर्शनला का वगळले, हा प्रश्नही गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहेत. सुदर्शनला बाद केल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याची जागा घेतली आणि त्याने 4 ते 3 क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात केली. तर विजय शंकर आता गुजरातसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. म्हणजेच गुजरातचे टॉप 4 फलंदाज उजव्या हाताचे बनले आहेत. तर पहिल्या टॉप ऑर्डरमध्ये सुदर्शन हा एकमेव डावखुरा फलंदाज होता.
गुजरातकडे डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियासारखे डावखुरे फलंदाज आहेत, पण ते मध्यम आणि खालच्या फळीतील फलंदाज आहेत आणि जसजशी स्पर्धा पुढे सरकत आहे, तसतशी गुजरातला साई सुदर्शनसारख्या योग्य फलंदाजाची नितांत गरज आहे, जो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल. एक, तो डाव सांभाळू शकेल आणि एक टोक सांभाळू शकेल, पण त्याला बाहेर करून पांड्यानेच संघाचा खेळ खल्लास केला.