मुकेश अंबानी देशाची पाचवी सर्वात मोठी खाजगी वित्तीय संस्था बनवण्याच्या अगदी जवळ आहेत. वित्तीय सेवा उद्योगावर कब्जा करण्यासाठी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडला रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांनी हे डिमर्जर शेअरधारक आणि कर्जदारांसमोर नेले. मंगळवारी या प्रकरणावर चर्चा झाली आणि सर्वांनी या दोन कंपन्यांच्या विभक्त होण्यास मान्यता दिली. आता Reliance Strategic Investments Limited चे नाव बदलून Jio Financial Services Limited असे करण्यात येणार आहे.
मुकेश अंबानींची जिओ फायनान्शिअल बनणार देशातील 5वी मोठी फायनान्सर
डिमर्जर योजनेअंतर्गत, RIL च्या भागधारकांना प्रत्येक शेअरसाठी Jio Financial चा एक हिस्सा दिला जाईल. कंपनीने मार्केटला दिलेल्या फाइलिंगनुसार, रिलायन्सच्या डिमर्जरला 100 टक्के मते मिळाली आहेत. सेंट्रम ब्रोकिंगच्या गणनेनुसार, जिओ फायनान्शिअल त्याच्या नेट वर्थनुसार देशातील पाचव्या क्रमांकाचा फायनान्सर बनेल. JFSL नंतर कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्सचा नंबर येईल. सध्या, NBFCs च्या बाजार मूल्यावर एकूण निव्वळ संपत्ती 10.84 लाख कोटी रुपये एवढी आहे.
ICICI बँकेचे माजी बॉस के.व्ही.कामथ रिलायन्सचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून रुजू झाले आहेत. त्यांचा फायदा आता जेएफएसएलमध्ये पाहायला मिळणार आहे. जिओ फायनान्शिअल केव्ही कामथ यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन NBFC आणि FinTech क्षेत्रात आघाडीवर बनू पाहत आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड, रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स, जिओ पेमेंट्स बँक, रिलायन्स रिटेल फायनान्स, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिसेस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंगमध्ये फायनान्शियल सर्व्हिसेसने सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
या बातमीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. दुपारी एक वाजता कंपनीचा शेअर 0.69 टक्क्यांनी म्हणजेच 16.60 रुपयांच्या वाढीसह 2436.40 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर आज कंपनीचा शेअर 2423.40 रुपयांवर उघडला आणि ट्रेडिंग सत्रात 2438.85 रुपयांसह दिवसाच्या उच्चांकावर गेला. तसे, एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 2419.80 रुपयांवर बंद झाला होता. तसे, कंपनीचे बाजार मूल्य 16.50 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.