उर्फी जावेदला तिचा ‘स्टाईल’ पडली महागात, तारेने बनवलेल्या ड्रेसमुळे झाली त्वचेची वाईट अवस्था


सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला तिच्या फॅशन सेन्स आणि रंगीबेरंगी ड्रेसमुळे बरीच ओळख मिळाली आहे. तुम्ही विचार करू शकत नाही अशा प्रत्येक गोष्टीतून उर्फी जावेद ड्रेस बनवते आणि परिधान करते. कधी कधी उर्फी जावेदला भन्नाट स्टाईलमुळे वेदना सहन कराव्या लागतात. असेच काहीसे लेटेस्ट ड्रेस परिधान करताना उर्फीसोबत घडले.

उर्फी जावेद काल रात्री मुंबईत हिरव्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. हा ड्रेस खास उर्फीच्या स्टाईलमध्ये तयार करण्यात आला होता. तो दोन्ही बाजूंनी वायरच्या साहाय्याने जोडण्यात आले. उर्फी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या ग्लॅमरस ड्रेसमध्ये ती रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली.

उर्फी जावेदने आपली स्टाईल राखण्यासाठी हा ड्रेस घातला असेल, पण तिला याचा फटकाही सहन करावा लागला आहे. उर्फीने स्वतः इंस्टाग्रामवर सांगितले की ड्रेसमधील वायर वास्तविक आहे आणि त्यामुळे तिच्या त्वचेला अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ड्रेसच्या टाईट फिटिंगमुळे तिची कातडी तारेला चिटकून गेली होती.

उर्फीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या शरीरावर वायरच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. तिची स्थिती दाखवत ती म्हणाली की, याने त्वचेला इजा झाली असली, तरी मी त्यात छान दिसत आहे, त्यामुळे ठीक आहे.

उर्फीने असा ड्रेस परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, ज्यामुळे तिला दुखापत झाली. यापूर्वी तिने गळ्यात खूप साखळ्या घातलेल्या दिसल्या होत्या. तो ड्रेस घातल्यानंतर उर्फीच्या मानेवर खुणा उमटल्या होत्या. कधीकधी उर्फी मेकअपमुळे तिच्या त्वचेचे नुकसान करते.