रविवारी आयपीएलमध्ये डबल हेडरचा दिवस आहे. यावेळीही तेच होणार असून 30 एप्रिल रोजी दोन सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होईल, तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल. हा सामना आयपीएलचा 1000 वा सामना असेल आणि रोहित शर्माचा वाढदिवसही याच दिवशी आहे. रोहितला या दिवशी खास भेट मिळणार आहे.
रोहित शर्माला वाढदिवशी मिळणार खास गिफ्ट, ज्याला पहिल्यांदाच चॅम्पियन केले तिथे होणार सन्मान
मुंबई आणि राजस्थानचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहितचा वाढदिवस देखील 30 एप्रिलला आहे आणि या दिवशी त्याला एक खास भेट मिळेल याची खात्री आहे. मात्र, ही भेट त्याला मुंबईत मिळणार नसून अन्यत्र मिळणार आहे.
रोहितने मुंबईला पाचवेळा आयपीएल जिंकून दिले आहे. इथून तो देशांतर्गत क्रिकेटही खेळतो पण त्याच्या वाढदिवशी 700 किमी दूर हैदराबादमध्ये त्याला ही भेट मिळेल. रोहितचा 60 फूट कटआउट हैदराबादमध्ये बसवण्यात येणार आहे. रोहितच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे उद्घाटन होणार आहे. या कट आऊटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
A 60ft cutout for Rohit Sharma will be unveiled on his birthday on 30th April in Hyderabad.
– The biggest cutout ever for a cricketer! pic.twitter.com/ZPhIxRfmS3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2023
रोहितला मुंबईतही नक्कीच काहीतरी गिफ्ट मिळेल पण त्याच्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजे त्याचा संघ जिंकला. रोहितला यापेक्षा अधिक काही आवडणार नाही.हैदराबाद आणि रोहितचे खास नाते आहे. रोहितने त्याच फ्रँचायझी डेक्कन चेजर्ससह आयपीएलमधील कारकिर्दीची सुरुवात केली आणि 2009 मध्ये पहिले आयपीएल जिंकले.
पाच वेळच्या विजेत्या मुंबईचा सध्याचा हंगाम चांगला जात नाही. या हंगामात या संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. यापैकी तीनमध्ये त्यांना विजय मिळाला आहे, तर चारमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईसाठी प्लेऑफचा रस्ता कठीण होताना दिसत आहे. रोहितच्या संघाला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर उर्वरित सातही सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.
या मोसमात रोहितची बॅटही चांगली कामगिरी करत नाही. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून फारशा धावा निघालेल्या नाहीत. त्याने सात सामन्यांत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने हे अर्धशतक दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याच्याच घरात केले. त्याने सात सामन्यांत 181 धावा केल्या आहेत.