WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा, अजिंक्य रहाणेला संधी


जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताने संघ जाहीर केला आहे. या संघात अजिंक्य रहाणेला संधी मिळाली आहे. संघाची कमान रोहित शर्माकडे तर केएस भरत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. केएल राहुल आणि जयदेव उनाडकट यांनीही 15 सदस्यीय संघात आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. या मोठ्या सामन्यासाठी 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.


ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात यष्टीरक्षक केएस भरत व्यतिरिक्त 6 प्रमुख फलंदाज असतील. त्याचबरोबर 5 वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय 3 फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला असून त्यात दोन डावखुरे आहेत.

WTC फायनलसाठी टीम इंडिया खालीलप्रमाणे आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट