आयर्लंड संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आयर्लंडच्या दोन फलंदाजांमुळे श्रीलंकेचा संघ चांगलाच अडचणीत आला. कुर्टिस केम्पर आणि पॉल स्टर्लिंग अशी हे खेळाडू आहेत. या सामन्यात या खेळाडूंनी शतके झळकावली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 492 धावांची मजल मारली.
SL vs IRE : आयर्लंडच्या फलंदाजांचा श्रीलंकेत धमाका, 2 शतके, एकाने रचला इतिहास
आयर्लंडच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना चकित करत धावांचा पाऊस पाडला. घरच्या मैदानावर आयरिश फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजांना अशा प्रकारे मुसंडी मारतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
या सामन्यात आयर्लंडकडून कुर्टिस कॅम्परने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 229 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली. त्यांच्या खेळीची खास गोष्ट म्हणजे सातव्या क्रमांकावर असलेल्या कुर्टिसने हे शतक झळकावले. या क्रमांकावर येऊन शतक झळकावणे कुणासाठीही सोपे नाही. पण कुर्टिसने हे काम केले, तेही श्रीलंकेविरुद्ध त्याच्याच घरात.
A maiden Test match century for Paul Stirling! Brought up in fitting style with a six 💥
Sensational innings, he now has centuries in all formats of international cricket 👏👏
WATCH: https://t.co/uMsnHMi5xS
SCORE: https://t.co/epQHAclj0P#BackingGreen ☘🏏 #SRIvIRE pic.twitter.com/jlqZyla8IL— Cricket Ireland (@cricketireland) April 25, 2023
कुर्टिसचे हे कसोटीतील पहिले शतक आहे. कर्टिसच्या या शतकाच्या जोरावर आयर्लंडला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले. कुर्टिसची ही केवळ तिसरी कसोटी होती आणि त्यात त्याने शतक झळकावून आपली क्षमता दाखवली.
कुर्टिसच्या आधी आयर्लंड संघाचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू पॉल स्टारलिंगनेही शतक झळकावले. स्टारलिंगनेही या शतकासह इतिहास रचला. हे त्याचे कसोटीतील पहिले शतक आहे. यासह, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो आयर्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.
स्टारलिंगने या सामन्याच्या पहिल्या डावात 181 चेंडूंचा सामना केला आणि नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. त्याच्या शतकाने आयर्लंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला, जो कर्टिस आणि लॉर्कन टकर यांनी पूर्ण केला. टकरने 106 चेंडूत 80 धावांची खेळी केली आणि कुर्टिससोबत 89 धावांची भागीदारी केली. या सर्वांशिवाय अँडी बालबर्नीने 95 धावांची खेळी केली.