माधुरी दीक्षितनंतर सोनम कपूरसोबत दिसले अॅपलचे सीईओ टिम कुक, दिल्लीत घेतला आयपीएल मॅचचा आनंद


सोनम कपूरचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. खरं तर, अलीकडेच ती अॅपलचे सीईओ टिम कुकसोबत दिसली होत. अलीकडेच दिल्लीत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल सामना झाला. ज्यामध्ये सोनम पती आनंद आहुजासोबत पोहोचली होती. यावेळी टीम कुकही उपस्थित होते. टीम कुक सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

सोनम कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अॅपलच्या सीईओसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये ही अभिनेत्री भारतीय लूकमध्ये सामना पाहण्यासाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान टीम कुकही त्यांच्यासोबत आयपीएल एन्जॉय करताना दिसत आहे.


सोनम आणि आनंद दोघांनीही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सोनम स्टेडियममध्येच टीम कुक आणि आनंद आहुजासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सोनमच्या लूकच्या प्रेमात अनेकजण पडले आहेत. सोनमने यावेळी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. ज्याचे लोक खूप कौतुक करत आहेत.

याआधी टीम 2016 साली भारतात आले होते. आता ते बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत दिसले होते. त्याने मुंबईत माधुरीसोबत वडापाव घेतला होता. आता सोनम ही दुसरी अभिनेत्री आहे जिच्यासोबत टिम एन्जॉय करताना दिसले. 18 एप्रिल रोजी त्यांनी मुंबईतील पहिल्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केले आहे. सोनम आणि आनंदनेही टीम कुकचे या नव्या आणि चांगल्या पाऊलासाठी अभिनंदन केले आहे. ज्यासाठी टिमने या जोडप्याचे आभार मानले आहेत.