IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सच्या कोणत्या वस्तू गेल्या चोरीला, समोर आली यादी ?


आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासाठी संघर्ष करत आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सलग 5 सामने गमावले आहेत. पहिल्या विजयाच्या इराद्याने दिल्ली गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरेल, पण त्याआधीच संपूर्ण संघ हादरला. एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्ली संघातील खेळाडूंचे सामान चोरीला गेले असून, खेळाडूंचे लाखोंचे लाखोचे नुकसान झाले आहे.

कॅप्टन डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, फिल सॉल्ट, यश धुल यांच्यासह अनेक खेळाडूंचे सामान चोरीला गेले. बॅट, थाई पॅड, ग्लोव्हज, शूज, मिनी पॅड, सनग्लासेस असा लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. संघातील जवळपास सर्वच खेळाडूंची बॅट चोरी गेली आहे. यश धुलच्या सर्वाधिक 5 बॅट चोरीला गेल्या आहेत.


एवढेच नाही तर चोरीच्या प्रत्येक बॅटची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्स पोलिसांची मदत घेत आहे. दिल्लीच्या खेळाडूंना एक दिवसानंतर त्यांचे सामान त्यांच्याजवळ पोहोचल्यावर चोरीची माहिती मिळाली. वृत्तानुसार, धुल आणि मार्शची बॅट, ज्यांच्या बरोबर ते खेळायचे, ती चोरीला गेली आहे.

दिल्ली संघ लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याविरुद्ध सामने गमावला आहे आणि सर्व सामने मोठ्या फरकाने हरले आहेत. 5 पराभवांसह दिल्ली पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. त्यांना लीगमधून बाहेर फेकले जाण्याचाही धोका आहे.

चोरीच्या वस्तूंची यादी – बॅट – 17, थायपॅड – 3, ग्लोव्हज – 7, मॅन पॅड – 3, शूज – 3, सनग्लासेस – 2