रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हर्षल पटेल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध एम चिन्नास्वामी येथे शेवटचे षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याला अवघ्या दोन चेंडूनंतर अंपायरने गोलंदाजी करण्यापासून रोखले. अंपायरने गोलंदाजाला अशा प्रकारे रोखल्याचे क्रिकेटमध्ये क्वचितच घडले आहे. हे पाहून अनेकांच्या मनात असा प्रश्न पडेल की असे का घडले. तर आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत.
IPL 2023 : हर्षल पटेलला पंचांनी गोलंदाजीपासून का रोखले? जाणून घ्या संपूर्ण सत्य
पटेलने सुरुवातीचे दोन्ही चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या उंचीच्या वर फेकले होते. दोन्ही नो बॉल होते. क्रिकेटच्या नियमांनुसार, जर गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये दोन कंबरेपेक्षा जास्त उंचीचा नो बॉल टाकला, तर अंपायर त्याला गोलंदाजीपासून रोखू शकतो. शेवटच्या षटकात फाफ डुप्लेसी बेंगळुरूचा कर्णधार नव्हता आणि ग्लेन मॅक्सवेल कर्णधार होता. पंचांनी मॅक्सवेलला पटेलला काढून टाकण्यास सांगितले आणि त्याने तसे केले.
हे षटक कोण पूर्ण करणार हा प्रश्न बंगळुरूसमोर होता. मॅक्सवेलने स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली. उर्वरित चार चेंडू त्याने टाकले. या काळात मॅक्सवेलने रवींद्र जडेजाची विकेटही घेतली. त्याने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर जडेजाला बाद केले. या षटकात एकूण 16 धावा आल्या.
हर्षल पटेल मात्र या षटकापूर्वी विशेष काही करू शकला नाही. चेन्नईच्या फलंदाजांनी त्याला जोरदार मुसंडी मारली. पटेलने 3.2 षटकात 10.80 च्या इकॉनॉमीसह 36 धावा दिल्या आणि त्याला फक्त एकच बळी घेता आला. पटेलने मात्र शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या डेव्हॉन कॉनवेची विकेट संघाला मिळवून दिली.
या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत मोठी धावसंख्या उभारली. चेन्नईकडून कॉनवेने 45 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि सहा षटकार मारले. शिवम दुबेने 27 चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांसह 52 धावा केल्या. अजिंक्य रहाणेनेही 20 चेंडूत 37 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.