Pushpa Rules : अल्लू अर्जुन होणार दुसरा ‘रजनीकांत’? कोका कोलापासून फ्रूटीपर्यंत या ब्रँडवर करतो राज्य


जेव्हाही आपण दक्षिण भारतीय चित्रपटांचा विचार करतो, तेव्हा सर्वात पहिले नाव समोर येते ते म्हणजे सुपरस्टार ‘रजनीकांत’. रजनीकांत हे दक्षिण भारतातील असे अभिनेते आहेत, ज्यांच्या नावावरच चित्रपट हिट होण्याची खात्री असते. आता काळ बदलत आहे आणि ‘रजनीकांत’च्या सिंहासनाचे अनेक वारसदार रिंगणात आहेत. यामध्ये ‘अल्लू अर्जुन’चे नाव आघाडीवर आहे. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

गेल्या वर्षी अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने त्याला केवळ दक्षिणेतच नाही, तर संपूर्ण भारतात स्टार बनवले. जेव्हा भारतातील एका प्रतिष्ठित मासिकाने साऊथच्या सिनेमावर कव्हर स्टोरी केली होती, तेव्हाही अल्लू अर्जुन कव्हर पिक्चरसाठी त्याची पहिली पसंती बनला होता. अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ मध्‍ये एकटा नायक होता आणि 375 कोटींची कमाई करणारा हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा तेलगू चित्रपट होता. कंपन्या आणि बाजार आता त्याच्या यशाचा फायदा घेत आहेत.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा-२: द रुल’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या मनाचा ठाव घेत आहे. या ट्रेलरमधील सर्वात प्रसिद्ध संवाद म्हणजे ‘अब रुल पुष्पा का’, जसे की पहिल्या चित्रपटातील ‘झुकेगा नहीं साला…’. 550 सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यू सांगणारा हंसा रिसर्चचा 2022 चा अहवाल पाहिला तर बाजारात ‘रुल’ फक्त ‘ब्रँड अल्लू अर्जुन’ आहे.

अल्लू अर्जुनकडे कोका कोला, कोलगेट मॅक्सफ्रेश, केएफसी, एस्ट्रल पाईप्स, फ्रूटी, रेडबस आणि झोमॅटो यांसारख्या किमान 10 राष्ट्रीय ब्रँड्ससाठी एंडोर्समेंट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. दुसरीकडे, सेलिब्रिटी ब्रँड्सच्या बाबतीत तो विजय आणि सूर्यापेक्षा खूप पुढे आहे.

पहिल्या ‘पुष्पा’च्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या चित्रपटाची फी 85 कोटी रुपये केली. त्याच वेळी, ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून, तो अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खान सारख्या स्टार्सच्या बरोबरीने आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 6 ते 7 कोटी रुपये आकारतो.

गेल्या वर्षी, जेव्हा कोविड नंतर पुन्हा चित्रपटगृहांमध्ये लोक येणे-जाणे सुरू झाले, तेव्हा हिंदी चित्रपटांचा फार वाईट टप्पा पाहायला मिळाला. बड्या स्टार्सच्या चित्रपटांना सपशेल आपटी खाल्ली. तर दुसरीकडे साऊथच्या चित्रपटांनी कमाल केली. ‘RRR’, ‘KGF: Chapter 2’ आणि ‘Pushpa’ ने देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आणि फॅन फॉलोइंग वाढवले.

अल्लू अर्जुनच्या ब्रँड व्हॅल्यूचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की हंसा रिसर्चच्या अहवालानुसार, भारतातील टॉप-10 सेलिब्रिटींच्या यादीत दक्षिणेतील चित्रपटांमधून येणारा तो एकमेव स्टार आहे. इतकंच नाही तर क्रोलच्या एका अहवालात त्याला देशातील सर्व स्टार्सच्या यादीत 20 व्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. जर आपण अल्लू अर्जुनच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ती 370 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.