IPL 2023 : पहिल्यांदाच मिळाली आयपीएलमध्ये संधी, 2 सामन्यात जिंकला आत्मविश्वास, आता RCB चे वाढवणार टेन्शन?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज त्यांच्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. आयपीएल-2023 मधील बंगळुरूचा हा तिसरा आणि घरच्या मैदानावरील दुसरा सामना आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत त्यांनी एक जिंकला असून एक पराभव पत्करला आहे. बंगळुरूने मोसमातील त्यांच्या घरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता, पण नंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. बंगळुरू आपल्या घरी परतत असेल, तर विजयाची शक्यता वाढली आहे, पण लखनौचा एक खेळाडू त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. हा खेळाडू आहे काइल मायर्स.

काइल मायर्स या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल पदार्पणातच अर्धशतक झळकावले. या मोसमातील पहिल्या सामन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि या सामन्यात मायर्सने 73 धावांची खेळी केली. यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही 53 धावा केल्या.

मायर्स ज्या फॉर्ममध्ये आहे, तो कोणत्याही गोलंदाजाचा खेळ खराब करू शकतो. त्याचवेळी आयपीएलमध्ये बंगळुरूची गोलंदाजी पाहिली तर अपेक्षेइतका प्रभाव टाकता आला नाही. मोहम्मद सिराजने मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली, पण कोलकाताविरुद्ध तो चांगलाच महागात पडला. हर्षल पटेल यांच्याकडून सर्वात मोठी निराशा झाली आहे. पटेलने गेल्या दोन मोसमात दमदार खेळ दाखवला होता, मात्र या मोसमातील दोन सामन्यांत त्याने 7 षटकात 81 धावा लुटल्या असून त्याला केवळ दोनच बळी घेता आले आहेत.

बंगळुरूची एक कमतरता म्हणजे त्यांच्याकडे चांगले फिरकीपटू नाहीत. डु प्लेसिसने डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदला कोलकाताविरुद्ध फक्त एकच षटक दिले. मुंबईविरुद्ध त्याला गोलंदाजी दिली गेली नाही. कर्ण शर्माने कोलकाताविरुद्ध चांगली कामगिरी केली, पण कर्णची गोलंदाजी सातत्याने विकेट घेण्याइतकी प्रभावी नाही. कोलकात्याविरुद्ध बंगळुरूने ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱ्या मायकेल ब्रेसवेललाही संधी दिली, पण तो महागात पडला. श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा 10 एप्रिल रोजी संघात सामील होणार होता. तो आला तर बंगळुरूसाठी चांगले होईल.

मायर्सचे आयपीएल पदार्पण झाले, कारण त्यांचा सलामीवीर क्विंटन डी कॉक, ज्याने लखनौला गेल्या मोसमात प्लेऑफमध्ये नेले, तो त्याच्या राष्ट्रीय संघ दक्षिण आफ्रिकेसह नेदरलँड्सविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत होता. त्यानंतर आयपीएल सुरू झाले आणि लखनऊने दोन सामने खेळले. मायर्सने या दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली. तिसऱ्या सामन्यात डिकॉक उपलब्ध होता, तरीही राहुलने मायर्सला संधी दिली.

राहुलचा मायर्सवर विश्वास आहे. त्याचे एक कारण म्हणजे तो अष्टपैलू खेळाडू आहे. मायर्सही नवीन चेंडूने गोलंदाजी करतो. आतापर्यंत तो आयपीएलमध्ये एकही विकेट घेऊ शकला नसला तरी तो संघाला समतोल राखतो आणि संघाला सखोलता देतो.