Mango on EMI : फळांचा राजा हापूस आंबा आता EMI वर उपलब्ध, वाढत्या किमतींमुळे व्यावसायिकाने सुरू केली योजना


जगभरात आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता, पुण्यातील एका व्यावसायिकाने ग्राहकांना फळांचा राजा खरेदी करण्यासाठी सुलभ मासिक हप्त्यांची अनोखी सुविधा देऊ केली आहे. महाराष्ट्रातील देवगड आणि रत्नागिरी येथे पिकवलेला अल्फान्सो आंबा म्हणूनही ओळखला जातो. आंब्याच्या सर्व जातींमध्ये हापूस हा सर्वोत्तम मानला जातो. परंतु उत्कृष्ट चव आणि कमी उत्पादनामुळे त्याच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहतात.

यंदाही किरकोळ बाजारात हापूस आंबा 800 ते 1300 रुपये प्रति डझन या दराने विकला जात आहे. अशा परिस्थितीत या खास आंब्याची चव सर्वसामान्यांना मिळावी, यासाठी गौरव सणस नावाच्या व्यावसायिकाने अनोखी ऑफर आणली आहे. तो आता हापूसला कोणत्याही महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूप्रमाणे सुलभ मासिक हप्त्यावर म्हणजेच ईएमआयवर विकण्यास तयार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सणसने सांगितले की, विक्री सुरू होताच हापूसच्या किमती वाढल्या आहेत. त्यांनी सांगितले की अशा परिस्थितीत जर हापूस देखील ईएमआयवर दिले, तर प्रत्येकजण त्याची चव घेऊ शकेल.

गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रोडक्ट्स या फळांची व्यापारी संस्था असलेल्या सणसचा दावा आहे की, EMI वर आंबा विकणारी देशातील पहिली संस्था आहे. ते म्हणाले की आम्हाला वाटले की जर फ्रीज, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ईएमआयवर खरेदी करता येतात, तर आंबा का नाही. अशा प्रकारे प्रत्येकजण हा आंबा खरेदी करू शकतो.

EMI वर मोबाईल फोन विकत घेतल्याप्रमाणे कोणीही त्यांच्या दुकानातून हप्त्यांवर हापूस खरेदी करू शकतो. यासाठी ग्राहकाकडे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर खरेदीची किंमत तीन, सहा किंवा 12 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये रूपांतरित केली जाते.

तथापि, सणस स्टोअरमध्ये EMI वर हापूस खरेदी करण्यासाठी किमान रु 5,000 ची खरेदी आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत चार जण पुढे आल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रकारे EMI वर हापूसची विक्री करण्याचा प्रवास सुरू झाला.