Tiger Vs Pathaan : ब्रेकअप! आता मोठ्या पडद्यावर टायगरला भिडणार पठाण


2023 च्या सुरुवातीला आपण शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉलीवूडच्या वाईट दिवसांच्या कट्टू आठवणींना तिलांजली दिली आणि खूप कमाई केली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खानच्या जोडीनेही चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. हे दोन्ही सुपरस्टार बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर दिसले.

आता हे दोन्ही सुपरस्टार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण त्यात एक ट्विस्ट आहे. रिपोर्ट्सनुसार, आता यशराज फिल्म्सने एक मोठी घोषणा केली आहे. आता पठाण आणि टायगरमधील पूर्वीचे वैर पाहायला मिळणार आहे. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार त्यांनी यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या टायगर विरुद्ध पठाण असा टॅग आहे.


यावर आता लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलताना दिसत आहेत. सलमान खान आणि शाहरुख खान यांची ऑनस्क्रीन टक्कर पाहायला मिळणार हे या शीर्षकावरून स्पष्ट होते. यापेक्षा चाहत्यांना काय उत्सुकता असेल. तरणने ट्विटरवर माहिती दिली आहे. यात YRF च्या spay universe मधील एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता.

यासोबतच तरण आदर्शने यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली येणाऱ्या आगामी चित्रपटांबद्दलही सांगितले. या यादीत त्यांनी टायगर 3, वॉर 2 सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच टायगर विरुद्ध पठाण चित्रपटाचाही या यादीत समावेश होणार आहे. याचा अर्थ बॉलिवूडचे दोन दिग्गज सुपरस्टार आणि खऱ्या आयुष्यातील बेस्ट फ्रेंड येत्या काळात आमनेसामने येणार असल्याचे निश्चित झाले आहे.