विजय मिळल्यानंतर कर्णधार आनंदी असतो. पण, लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी संतापलेला दिसत होता. त्याचा राग संपूर्ण संघावर नसून त्याच्या गोलंदाजांवर होता. विशेषत: त्या एका गोलंदाजासाठी जरा जास्तच, जो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळत होता, परंतु संघाच्या कामगिरीवर त्याचा प्रभाव सोडण्यात अपयशी ठरला. आम्ही बोलतोय तुषार देशपांडेबद्दल, ज्याच्यावर धोनी मॅचनंतर संतापलेला दिसला.
IPL 2023 : विजयानंतरही संतापला एमएस धोनी, ‘इम्पॅक्ट प्लेयर’वर काढला राग
तुषार देशपांडेने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 4 षटकात 45 धावा देत 2 बळी घेतले. धोनीला त्याच्या कामगिरीवर राग आला नाही, तर तो पुन्हा पुन्हा करत असलेल्या चुकीचा. विशेषत: सामन्याच्या शेवटच्या आणि निर्णायक षटकातही त्याने चुका करणे सोडले नाही.
शेवटच्या षटकात लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 28 धावांची गरज होती. अशा स्थितीत सीएसकेचा कर्णधार धोनीने तुषार देशपांडेकडे चेंडू सोपवला. त्याने पहिलाच चेंडू वाईड फेकला. यानंतर टाकलेला चेंडू नो बॉल ठरला. यासह लखनौला लेग बायची 1 धावही मिळाली. आता शेवटच्या षटकात लखनौसमोर जे लक्ष्य होते ते कमी झाले होते.
यानंतर मात्र तुषारने एकही अतिरिक्त चेंडू टाकला नाही. त्याने बडोनीची विकेटही घेतली आणि 12 धावांनी आधीच लखनौच्या धावांचा पाठलाग थांबवला. मात्र या षटकाच्या सुरुवातीलाच तुषारच्या चुकीची नाराजी सामन्यानंतर धोनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
धोनीच्या घाबरण्याचे कारण केवळ तुषारची शेवटच्या षटकातील चूक नव्हती. तर याआधीही त्याने 2 नो बॉल आणि 3 वाईड टाकले होते. म्हणजे एकंदरीत, धोनीच्या चेहऱ्यावर दिसणारा राग हा त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये टाकलेल्या 4 वाईड्स आणि 3 नो बॉलचा परिणाम होता. तुषार देशपांडे केवळ CSKचा नाही, तर IPL 2023 चा पहिला इम्पॅक्ट प्लेयर आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यातही तो याच भूमिकेत होता.